Mumbai : मध्य रेल्वेत दि. ५.६.२०२१ रोजी जागतिक पर्यावरण दिन पाळण्यात आला. या वर्षीची थीम “इकोसिस्टम रीस्टोरेशन” आहे.
श्री आलोक कंसल, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, श्रीमती तनुजा कंसल, अध्यक्षा, मध्य रेल्वे महिला कल्याण संस्था (सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ), श्री ए के श्रीवास्तव, अतिरिक्त महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, अन्य प्रधान विभागाध्यक्ष (पीएचओडी) आणि श्री शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रोपे लावली. श्री रविप्रताप सिंह आणि श्री. सुब्रमणि अय्यर, कार्यकारी संचालक, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.
श्री आलोक कंसल यांनी मियावाकी या जलद गतीने वाढणार्या दाट वृक्षारोपण प्रणालीला भेट दिली, ज्यामध्ये प्रति चौरस मीटर सुमारे ३ ते ४ रोपे लावली जातात. मध्य रेल्वेने प्रथमच मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस येथील २५० चौरस मीटर क्षेत्रावर कॉर्पोरेट सोशल रिस्पोनसिबीलिटी तून मियावाकी वृक्षारोपण उपक्रम राबविला. एकूण १,००० रोपे लावण्यात आली.
श्री कंसल यांना बीपीसीएल अधिका-यांकडून झाडे लावण्याचे प्रमाणपत्रही प्राप्त झाले.
त्यांनी ईएनएचएम, इलेक्ट्रिकल आणि इतर विभागांच्या पर्यावरणविषयक माहिती स्टॉलला भेट दिली. त्यांनी इंधन बिले वाचविणा-या, पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन यात जबरदस्त सुधारणा केलेल्या छतावरील टॉप सोलर पॅनेल, एलईडी लाइटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट, सांडपाणी पुनःशुद्धीकरण प्रक्रिया संयंत्र, घनकचरा व्यवस्थापन, लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील बायो टॉयलेट्स, प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन इ. स्टॉल्सचे अवलोकन केले. श्री कंसल यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात हरित उपक्रम स्टॉल्स आणि मियावाकी वृक्षारोपणांसाठी प्रत्येकी २५,०००/- रुपये पुरस्कार जाहीर केला.
श्री कंसल यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सेल्फ-प्रोपेल्ड इंस्पेक्शन कारची (एसपीआयसी) तपासणी केली. एसपीआयसीचा उपयोग ट्रॅक, सिग्नल, विद्युत उपकरण इत्यादींच्या तातडीच्या तपासणीसाठी तसेच सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वेच्या विवक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी करण्यात येतो. श्री कंसल यांनी भायखळा स्थानकात हेरिटेज रीस्टोरेशन करण्याच्या कामाची पाहणी केली व अधिका-यांना हे काम लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या.
पार्श्वभूमी:
यावर्षीच्या “इकोसिस्टम रीस्टोरेशन” या विषयासह, मध्य रेल्वेने पर्यावरण संवर्धनासाठी विविध पावले उचलली आहेत. गेल्या चार वर्षांत मध्य रेल्वेने रेल्वेच्या जमीनीवर विविध प्रकारच्या झाडाच्या १८ लाखाहून अधिक रोपट्यांची लागवड केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुर्मिळ अश्या १२० रोपे असलेली एक हर्बल गार्डन स्थापित केली गेली आहे. मध्य रेल्वेवर यापूर्वीच १५ रोपवाटिका उभारल्या आहेत आणि विकसित केल्या आहेत. मध्य रेल्वेतील वाडी बंदर, मुंबई येथे ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्लांट, ८७ इको-स्मार्ट स्टेशन, १३३ स्थानकांवर रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट, ५ इमारतींना आयजीबीसी हरित प्रमाणपत्र हे मागील काही वर्षांतील हरित वातावरणासाठी मिळालेले यश आणि इतर कामगिरी आहेत.