मुंबई : सेलेब्रिटी दिव्यांका त्रिपाठी, विद्या माळवदे यांनी पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) रोगाने पीडित महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ओझीवा या भारताच्या पहिल्या क्लीन-लेबल अॅक्टिव्ह न्यूट्रिशन ब्रॅंडद्वारे राबविण्यात आलेल्या #मायपीसीओएसस्टोरी या मोहिमेला आपला पाठिंबा दर्शविला आहे. या मोहिमेचा उद्देश या रोगाने पीडित महिलांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी उद्युक्त करून एक असा समुदाय तयार करणे, ज्यात सर्वजण एकमेकांना सल्ला आणि माहिती देऊन सक्षम करतील.
यानिमित्ताने अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करून एक हॉर्मोनल विकार पीसीओएस आणि त्यांच्या लक्षणांबद्दल महिला आजही पुरेशा जागरूक नसल्याचे निदर्शनास आणले आहे. तसेच आपल्या जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करून रासायनिक पदार्थ खाण्याचे टाळून नियमित व्यायाम करण्याचा आणि चांगली झोप घेण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेत्री विद्या माळवदेही या मोहिमेत सहभागी झाली या दोघीनींही महिलांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.