मुंबई : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे संरक्षण आणि जतन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 46 व्या भागात ते आज बोलत होते. भारतासारख्या विशाल देशात काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात पाऊस कधी येईल अशी चिंता आहे. मात्र याबद्दल पावसाला दोष देता येणार नाही कारण मानवजातीने निसर्गाबरोबर संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
गणेशोत्सव जवळ आला असून, हा उत्सव उत्साहाने साजरा करतानाच तो पर्यावरण स्नेही रहावा, यावर कटाक्ष ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. महाराष्ट्रातल्या पंढरपूर यात्रेचा, वारीचा उल्लेख करत, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, रामदास या संताची शिकवण आजच्या काळातही जनतेला शिक्षीत करण्यासाठी उपयुक्त असल्याचे पंतप्रधान म्हणाले. अंधश्रद्धेविरुद्ध लढा देण्यासाठी संताची शिकवण प्रेरणा देते, भारुड, अभंग यासारख्या रचनातुन बंधुत्व आणि प्रेमाचा संदेश मिळतो असे ते म्हणाले.
महाविद्यालयीन जीवनात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शांतचित्त राहून जीवनाचा आनंद घ्यावा आणि आत्मिक समाधानाची अनुभूती घ्यावी असा सल्ला त्यांनी या विद्यार्थ्यांना दिला. नवी भाषा संस्कृती आत्मसात करण्यावर नवी कौशल्य विकसित करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा थायलंडमधे गुहेत अडकलेल्या फुटबॉलपटूंच्या संघाला सुखरुप बाहेर काढण्यासाठी मानवता एकवटल्याचे चित्र पहायला मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
बाळ गंगाधर टिळक, चंद्रशेखर आझाद या थोर नेत्यांचे स्मरण करत पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
फिनलंडमधे 20 वर्षाखालील वयोगटाच्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत 400 मीटर धावणाऱ्या क्रीडा प्रकारात हिमा दासने सुवर्ण पदक पटकावत इतिहास निर्माण केल्याचे सांगून त्यांनी हिमा दासचे अभिनंदन केले. सुंदरसिंह गुर्जर, एकता भयान, योगेश कथुनिया या दिव्यांग खेळाडूंनी देशाला अभिमानास्पद कामगिरी केली असून, त्यांच्या निर्धार आणि जिद्दीला सलाम असल्याचे पंतप्रधान म्हणा