रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी शहरात तीन दुकाने फोडणारी चोरट्यांची टोळी सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास चोरटय़ांनी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील तीन दुकाने फोडली आणि लाखोंचा ऐवज लंपास केला. मलुष्टे यांचे , बी. सी. ओसवाल, आझाद स्टोअर्स या दुकानांमधील चार लाखाहुन अधिक किमतीचा ऐवजाची चोरी केली गेली.
ओसवाल यांच्या दुकानामध्ये चोरी करताना हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. सिसिटीव्हीत कैद होत असल्याचे लक्षात येताच चोरट्यानी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्याचा प्रयत्नदेखील केला.