रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी-हातखंबा मार्गावर काल शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका नॅनो कारने अचानक पेट घेतला. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली.
रत्नागिरीतील गवळीवाडा येथील तानाजी धरणे यांच्या मालकीची कार होती. काल रात्री कुवारबावजवळील आरके फर्नीचर समोर कारने अचानक पेट घेतला. यावेळी प्रसंगावधान राखत गाडीत असणारे प्रवासी पटकन बाहेर पडले. लागलेली आग इतकी मोठी होती, कि काही काळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. आग लागण्याचे कारण स्पष्ट झाले नाही.