मुंबई : मोदी सरकारनं आणलेल्या CAB(भारतीय नागरिकत्व सुधारणा विधेयक) ला आज देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत तीव्र विरोध होताना पहायला मिळत आहे. याविरोधात डाव्या-पुरोगामी-विद्यार्थी संघटनांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट क्रांती मैदानात सभा घेण्यात येत आहे. ऑगस्ट क्रांती मैदान पूर्णपणे गर्दीने भरून गेले आहे. हातात तिरंगा आणि विविध लक्षवेधी फलक घेऊन नागरिक या ठिकाणी येत आहेत. मैदानाच्या बाहेर प्रचंड गर्दी जमली आहे.
नागरिक सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदान येथे अनेक संघटना व विद्यार्थी एकत्र आंदोलन करत आहेत. हे विधेयक घटनेविरुद्ध असून त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी केली जात आहे. मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात येत आहेत. हजारो विद्यार्थी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.