रत्नागिरी (आरकेजी): आगामी काळात एनपीएचे पमाण कमी करण्याकरीता दिवाळखोरी व नादारी प्रतिबंधक कायदा अधिक व्यापक होणार आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये सनदी लेखा परीक्षकांची मोठी भूमिका राहणार आहे. त्यासाठी सर्व सी. ए. लोकांनी तयार व्हावे, असे आवाहन नाशिकचे अभ्यासू सी. ए. उदयराज पटवर्धन यांनी केले.
ते सी. ए. इन्स्टीट्यूट रत्नागिरीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सेमिनारमध्ये ते बोलत होते. या कार्यशाळेत रत्नागिरीतील 36 सी. ए. सहभागी झाले होते. मान्यवरांचे स्वागत सी. ए. इन्स्टीट्यूट रत्नागिरीचे अध्यक्ष सी. ए. श्रीरंग वैद्य यांनी केले. यावेळी कोषाध्यक्ष अभिजीत चव्हाण उपस्थित होते. ताणतणाव व्यवस्थापन या मुद्यावर विजयदुर्गचे डॉ. यश वेलणकर यांचे व्याख्यान झाले. मुंबईचे सी. ए. उदय काळे इ-वे बील याविषयी उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले.
दरवर्षी जुलै महिन्यात सी. ए. दिवस साजरा केला जातो. यावर्षी त्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. भविष्यकाळात सीए मंडळींना प्रशिक्षण देण्यासाठी असोसिएशनतर्फे कार्यकम हाती घेण्यात येईल, असे अध्यक्ष श्रीरंग वैद्य यांनी सांगितले.