रत्नागिरी, (आरकेजी) : ब्यू बटण जेलीफिश येथील समुद्र किनार्यावर दिसत असल्याने ते पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे.
या जेलीफिशचा आकार बटणाएवढा असल्याने ते पर्यटकांना आकर्षून घेत आहेत. गावखडी, भाट्ये, आरेवारे, मालगुंड अशा विविध किनाऱ्य़ांवर ब्यू बटण जेलीफिशने सर्वांनाच भूरळ पाडली आहे. हे जेलीफिश समुहाने राहतात.
हे जेलीफिश पाच वर्षांनंतर किनारपट्टीवर दिसले आहेत. त्यांचे दर्शन मान्सुन आगमनाचे संकेत मानले जाते. ब्यू बटणचे शास्त्रीय नाव पॉर्पिटा पॉर्पिटा असे आहे. समशितोष्ण पाण्यात त्यांचे वास्तव्य आढळते.
जेलिफिश हातात घेण्याचा प्रयत्न करू नये
हे जेलीफिश पर्यटकांसाठी धोकादायक नाहीत.. किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांनी त्यांना हातात घेण्याचा प्रयत्न करु नये. त्यांचा सुक्ष्म दंख वेदनादायी ठरू शकतो. पाण्यात तरंगणाऱ्या ब्यू बटणचा समुह पोहताना शरिराला चिकटू नये, याची काळजी पर्यटकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मृत जेलिफिशचा खच
हिंदी महासागरात पाण्याच्या प्रवाह बदलला आहे. या प्रवाहाबरोबरच जेलिफिश अरबी समुद्रकिनारी दाखल झाले आहेत. लाटांबरोबर तरंगत असताना थेट किनाऱ्यावर आल्याने अनेक ब्यू बटण जेलीफिश या मृत झाले आहेत. त्यामुळे लाखोंच्या संख्येनी सध्या किनाऱ्यांवर या मृत ब्यू बटण जेलीफिशचा खच दिसत आहे.