मुंबई : पायाभूत सुविधांवर भर असणारा हा अर्थसंकल्प आहे, असे मत महिंद्रा लाईफस्पेसेसच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिता अर्जुनदास यांनी व्यक्त केले.
सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात सादर झालेल्या पायाभूत सुविधांच्या मांडणीचे स्वागत केले पाहिजे. या क्षेत्रातील विभागणीमुळे विकासकांच्या भांडवली भागात घट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे उभारणे शक्य होईल, असे अर्जुनदास म्हणाल्या.
पायाभूत सुविधांमधील नव्या बदलांत प्रामुख्याने विकासावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे पुरवठ्यातील त्रुटींमध्ये घट होणार आहे. गृह आणि पायाभूत सुविधांकडे लक्ष पुरविले गेल्याने उत्पादन वाढणार आहे. परिणामी नोकरीच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊन रोजगारात वाढ होणार आहे, याकडेही अर्जुनदास यांनी लक्ष वेधले.