रत्नागिरी (आरकेेजी): महाराष्ट्र पोलीस ‘रेजीग डे’ निमित्त रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा महोत्सव 2018 मधील बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते उपस्थित होते.
‘रेजिंग डे’ सप्ताहनिमित्त रत्नागिरी पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी ‘क्रिडा महोत्सव 2018’ चं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवातील जलद बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धा आजपासून सुरु झाल्या आहेत. या दोन्ही स्पर्धाचं उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. दोन दिवस या स्पर्धा चालणार आहेत. या दोन्ही स्पर्धेत एकूण 251 खेळाडू सहभागी झाले आहेत. बुद्धिबळ स्पर्धेत 97 खेळाडू सहभागी झाले आहेत, तर कॅरम स्पर्धेत 154 खेळाडू सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे बुद्धिबळ स्पर्धेत राज्यतरावर 15 वर्षांच्या आतील गटात पहिली आलेली नेहा मुळेही या स्पर्धेत सहभागी झाली आहे. नेहाने राष्ट्रीय स्तरावर तेलंगणामध्ये झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्रचं प्रतिनिधित्व केलं आहे. या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी नेहाचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यापूर्वी या क्रिडा महोत्सवातील कबड्डी आणि हॉलिबालच्या स्पर्धा पार पडल्या आहेत. या क्रीडा महोत्सवाचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ 12 जानेवारी रोजी पार पडणार आहे.