चेन्नई, 15 जुलै 2021 – बीएसए लेडीबर्ड या मुलींसाठीच्या भारतातील पहिल्या सायकल ब्रँडने बाजारपेठेत 25 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया लिमिटेडच्या बीएसए बॅनरअंतर्गत लेडीबर्ड सायकल्सना तिची अभिजातता आणि स्त्रीत्व यांमुळे कायमच पसंती मिळाली आहे. या सायकल्स किशोरवयात येत असलेल्या मुलींमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत.
गेल्या अडीच दशकांपासून ब्रँडने मुलींना स्वतंत्र आणि जबाबदार बनण्यासाठी सक्षम केले असून किशोरवयाकडे वाटचाल करत स्वतःची ओळख, स्वतःचे समाजातले स्थान शोधत असलेल्या मुलींना या नाजूक काळात आपल्या मालकीचे काहीतरी मिळवून दिले आहे.
उत्पादनाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास बीएसएने ग्राहक- केंद्रीत सायकल्सची विस्तृत श्रेणी उपलब्ध केली असून ती स्टायलिश, धमाल, व्यवहार्य, विश्वासार्ह आणि वापरण्यास सोपी म्हणून ओळखली जाते. अँटी स्लिप चेन, कुशन्ड सॅडल्स, सॉफ्ट हँड ग्रिप्स, स्टेप थ्रु फ्रेम्स, ईझी ग्लाइड हब्ज, फ्रंट बास्केट इत्यादी आणि विविध वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेल्या या ब्रँडला तरुण, उत्साही मुलींना आरामदायी राइड मिळवून देताना अतिशय अभिमान वाटतो.
रौप्यमहोत्सवी टप्पा जाहीर करताना टीआय सायकल्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष केके पॉल म्हणाले, ‘मजा, स्वातंत्र्य, उर्जा, स्टाइल आणि आरामदायीपणा ही मूल्ये बीएसए लेडीबर्डशी सुसंगत आहेत. गेल्या 25 वर्षांत बीएसए लेडीबर्डने केवळ मुलींच्या स्वातंत्र्याच्या प्रवासात साथ दिली नाही, तर ती या मुलींचे व्यक्तिमत्त्व आणि स्टाइलचा अविभाज्य भाग झाली आहे. केवळ गेल्या एका दशकात 3.5 दशलक्ष मुली व तरुणींनी बीएसए लेडीबर्ड सायकल चालवण्याचा आऩंद अनुभवला आहे. ही भावना आणखी प्रबळ करण्यासाठी आम्ही एक फिल्म वितरित केली असून त्यात कशाप्रकारे लहानपणीचे अनुभव आपल्याला समृद्ध करतात हे दाखवलेलं आहे. स्त्रियांच्या त्यांचा स्वप्नांचा पाठपुरावा करता यावा, त्यांना खंबीर होता यावे यासाठी आपण योग्य वेळी या मुलींसाठी असलेले स्वातंत्र्याचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. आपल्या विकासाच्या प्रवासात आम्हाला समावून घेतल्याबद्दल आणि आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आज आम्ही त्यांचे आभार मानतो.’
‘फन टर्न्स 25’ असे नाव असलेल्या या फिल्ममध्ये बीएसए लेडीबर्डची वैशिष्ट्ये दाखवण्यात आली असून ती येथे पाहाता येईल – https://www.youtube.com/watch?v=kcfCxmKFD8E
बीएसए लेडीबर्डच्या यशामागे सर्वोत्तम उत्पादने आणि सेवा पुरवणारी, मेहनती व समर्पित टीम समान उद्दिष्टासह काम करत आहे. इतक्या वर्षात या टीमने नाविन्यपूर्ण उत्पादने, कार्यक्षम उत्पादन आणि ग्राहक समाधान उंचावण्यासाठी काम केले आहे.
बीएसए सायकल्सचे उत्पादन अंबात्तुर आणि राजपुरा कारखान्यात केले जाते आणि देशभरातील कंपनीच्या 190 वितरकांच्या ट्रॅक अँड ट्रेल रिटेल चॅनेलद्वारे पॅन भारतात त्यांची विक्री केली जाते. 8 ते 15 वयोगटातील मुली या सायकल्सच्या प्रमुख ग्राहक असून त्या शाळा, शिकवणी वर्ग, मित्र- मैत्रिणींबरोबर बाहेर जाण्यासाठी किंवा नवनवे अनुभव मिळवण्यासाठी त्यांचा वापर करतात.
सर्वांसाठी सायकलिंग या तत्वाचा प्रसार करण्यावर बीएसएचा विश्वास आहे. तरुण मुलींशिवाय कंपनीकडे लहान मुलांसाठीच्या सायकल श्रेणीही उपलब्ध आहे. सायकलिंग मजेदार झाल्यामुळे मुलांमध्ये मोटर डेव्हलपमेंटसाठी आवश्यक कौशल्ये विकसित होण्यास मदत होते तसेच आत्मविश्वास सुधारणे, स्वावलंबाची भावना येणे, नवनवीन जागी जाणे आणि चांगली सामाजिक कौशल्ये आत्मसात करणे त्यांना शक्य होते. त्याशिवाय मुलांना सक्रिय आणि निरोगी राहाण्यासही मोठी मदत होते.