२१ दिवसीय विनामूल्य कोडिंग बूट शिबिराचे केले मुंबईत आयोजन
मुंबई : ब्रिजलॅब्ज सोल्युशन्स एलएलपी या भारतातील अत्यंत मोठ्या आयपी संचालित इंक्युबेशन लॅब्सचे लक्ष्य उगवत्या तंत्रज्ञान क्षेत्रात अभियंता प्रतिभा आणि कल्पना यांचे संगोपन करण्याचे आहे. कंपनीद्वारे मुंबईत २१ दिवसांच्या कोडिंग बूट शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून उमेदवारांना मूलभूत कोडिंग पद्धती शिकण्यास आणि लागू करण्यात मदत होईल ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते काम करण्यास सज्ज होतील. देशातील विविध भागात वर्षभर ही शिबीर आयोजित करण्यात येणार असून सुमारे ५००० अभियंत्यांना उद्योगासाठी तयार करण्याचे ब्रिजलॅब्जचे उद्दिष्ट आहे.
बूट शिबिराच्या शेवटी उमेदवारांना पूर्णतेची प्रमाणपत्रे दिली जातील, जी त्यांनी मूलभूत कोडिंगचे ज्ञान संपादित केल्याचे आणि काम करण्यास सज्ज असल्याचे प्रमाण असतील. शैक्षणिक तंत्रज्ञानामधून अभियंत्यांना नियुक्त करताना तांत्रिक तूट दूर करण्यासाठी आणि दोषपूर्ण शिक्षणपद्धतीमुळे वाढणारी कौशल्य दरी दूर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. कंपनीच्या फेलोशिप प्रोग्राममध्ये पुढे जायची तयारी दाखवल्यास बूट कॅम्पमधील अव्वल पात्र उमेदवारांना ब्रिजलॅब्स १००% नोकरीच्या संधीची हमी देण्यात येईल.
ब्रिजलॅब्जचे संस्थापक नारायण महादेवन म्हणाले, “तांत्रिक क्षेत्राची निरंतर वाढ लक्षात घेता, तांत्रिक क्षेत्राच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक कुशल आणि स्थिर अभियांत्रिकी प्रतिभा अस्तित्त्वात असणे आवश्यक आहे. कोडींग बूट शिबिर त्याच दिशेने पुढाकार घेत आहे, ज्यात संभाव्य आणि पात्र उमेदवारांना विनामूल्य शिष्यवृत्ती मिळेल. तसेच, ब्रिजलॅब्ज फेलोशिप प्रोग्राममध्ये टिकून राहणे निवडल्यास आमच्याकडे फायदेशीर नोकरीच्या संधीची हमी असते.”