मुंबई : विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठीची जगातील सर्वात मोठी पीअर टू पीअर कम्युनिटी, ब्रेनलीने आपल्या नवीन फंडिंग राऊंडमध्ये ३० दशलक्ष डॉलरची निधी उभारणी केली आहे. या फेरीचे नेतृत्व नॅस्पर्सने केले शिवाय त्यात रुना कॅपिटल आणि मंता रेचा सहभाग होता. ब्रेनलीच्या यापूर्वीच्या फंडिंग राऊंडसह कंपनीला आत्तापर्यंत एकूण ६८.५ दशलक्ष डॉलरचा निधी मिळाला आहे. प्राप्त निधीचा उपयोग ब्रेनलीचा यूझर एक्स्पीरियन्स वाढवण्यासाठी आणि जगभरातील विद्यार्थी व पालकांना पुरवण्यात येणा-या मदतीची गुणवत्ता सुधारण्यासाठी करण्यात येईल. त्याव्यतिरिक्त, भारतात आपला यूझर बेस वाढवण्यासाठी हा फंड कंपनीला सक्षम करेल. भारत हे त्यांच्या मुख्य बाजारपेठांपैकी एक आहे, ज्यात सतत वृद्धी होत आहे. येथे त्यांचे मासिक १५ दशलक्षपेक्षा जास्त खास यूझर्स आहेत.
ब्रेनलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक मिशेल बोर्कोव्ह्सकी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना सहयोगाने अभ्यास करण्यासाठी प्रेरित करून, यशस्वी होण्यासाठी त्यांना संसाधने व इतर साधने पुरवून शैक्षणिक मदतीची ही उपलब्धता भारतासहित जगातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे हे आमचे लक्ष्य आहे. उपलब्ध निधीद्वारे आम्हाला आता हे करणे शक्य होईल. भारतीय समुदायात आमची सेवा व्यापक करण्यासाठी मराठी, गुजराती, तेलुगू आणि पंजाबी यांसारख्या स्थानिक भाषांमधून चर्चा व अभ्यास करणा-या मुलांना मंच प्रदान करण्यासाठी देखील या निधीचा उपयोग करण्याचा आमचा मानस आहे.”