मुंबई : भारत पेट्रोलियम, ही भारतातील सर्वात मोठी ऑइल आणि गॅस उत्पादक कंपनी हर घर तिरंगा चळवळीत सहभागी झाली असून भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी कंपनीचे कर्मचारी देशभरातील नेटवर्कमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. त्यामध्ये कंपनीच्या ३ रिफायनरीज, १२३ इन्स्टॉलेशन्स आणि डेपोट, ५४ एलपीजी बॉटलिंग प्लँट्स, ल्युब ब्लेंडिग ब्लँट्स आणि ५६ एव्हिएशन सर्व्हिस स्टेशन्स यांचा समावेश असेल.
२०,००० पेक्षा जास्त फ्युएल स्टेशन्स आणि ६२१३ एलपीजी डिस्ट्रीब्युटर्ससह चॅनेल पार्टनर्स आणि त्यांचे कर्मचारीही या चळवळीत सहभागी होणार असून त्यांनी आपल्या ग्राहकांना झेंड्यांचे वाटप केले आहे.
कॉर्पोरेशनने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घरीही तिरंगा फडकवून हा पवित्र क्षण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
बीपीसीएलने हा दिवस साजरा करण्यासाठी एक खास म्युझिक व्हिडिओ तयार केला आहे, ज्यामध्ये कर्मचारी विविध ठिकाणी झेंडा फडकवताना दिसतात. सुमधूर संगीत असलेल्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
याप्रसंगी बीपीसीएलचे प्रमुख जनरल मॅनेजर (पीआर आणि ब्रँड) श्री. स. अब्बास अख्तर म्हणाले, ‘आझादी हा अम्रित महोत्सवाअंतर्गत साजऱ्या केल्या जात असलेल्या हर घर तिरंगा चळवळीत लोकांना भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाल्याचा क्षण साजरा करण्यासाठी घरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.’
या चळवळीमुळे तिरंगा अधिक आपलासा वाटणार असून हे राष्ट्रउभारणीच्या आमच्या बांधिलकीशी सुसंगत आहे.
आमच्या म्युझिक व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हेच नाते, देशभक्ती व अभिमानाची भावना मांडण्यात आली आहे.