मुंबई, २०२२: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या ‘महारत्न’ व फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनीला त्यांच्या शाश्वतता कामगिरीसाठी २०२२ सालच्या एसअँडपी डो जोन्स सस्टेनेबिलिटी इन्डायसेस (डीजेएसआय) कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट (सीएसए) रँकिंग्समध्ये भारतातील तेल आणि वायू क्षेत्रामध्ये प्रथम रँकिंग मिळाले आहे.
उद्योगक्षेत्राचा सरासरी स्कोर ३१ असताना तब्बल ६५ टक्के पॉईंट्स मिळवून भारतामध्ये डीजेएसआय इन्डायसेसमध्ये सर्वप्रथम येण्याचे हे बीपीसीएलचे सलग तिसरे वर्ष आहे. मागच्या वर्षी डीजेएसआय प्लॅटफॉर्मवर उद्योगक्षेत्राचा सरासरी स्कोर ३९ असताना, बीपीसीएलने ५९ स्कोर मिळवला होता आणि यावर्षीचा त्यांचा स्कोर त्याहीपेक्षा खूप चांगला आहे. हे बेंचमार्किंग म्हणजे समभागधारकांना प्रदान केल्या जाणाऱ्या दीर्घकालीन मूल्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून आर्थिक, पर्यावरणात्मक आणि सामाजिक निकषांचे संपूर्ण मूल्यांकन आहे.
हरित ऊर्जा परिवर्तन घडून यावे आणि नेट शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बीपीसीएल एक प्रभावी इकोसिस्टिम निर्माण करत आहे. १जी आणि २जी बायोएथनॉल, कॉम्प्रेस्ड बायोगॅस, बायोडिझेल, इव्ही चार्जिंग कॉरिडॉर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, मियावाकी आणि सीड बॉम्बिंग तंत्रांचा वापर करून झाडांची संख्या वाढवणे, २०२५पर्यंत ५०% रिटेल आउटलेट्सचे सोलरायझेशन, २०२५ पर्यंत १ गिगावॅट आणि २०४० पर्यंत १० गिगावॅट अशी उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून नूतनीकरणीय ऊर्जा पोर्टफोलिओमध्ये वाढ करणे यासारख्या कमी कार्बन उत्सर्जन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी बीपीसीएल अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत आहे.
ईएसजी (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन) ला अनुसरून कंपनी करत असलेल्या वाटचालीचे अधिक सखोल आणि संपूर्ण चित्र पुरवण्याची अनोखी संधी डीजेएसआयने आम्हाला दिली आहे. डीजेएसआयचे निवडक निष्कर्ष ब्लूमबर्ग प्रोफेशनल प्लॅटफॉर्मवर शेअर केले जातात, त्यामुळे सातत्याने वाढत असलेल्या गुंतवणूकदारांना ते पाहता येतात. गुंतवणूकदारांसाठीच्या एसअँडपी ५०० ईएसजी, एसअँडपी युरोप ३५० ईएसजी, एसअँडपी ग्लोबल १२०० ईएसजी इत्यादी अभिनव उत्पादनांमध्ये डो जोन्स सस्टेनेबिलिटी इन्डायसेस (डीजेएसआय) रेटिंग्सचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
आपल्या महत्त्वाच्या शाश्वत विकास मुद्द्यांमध्ये निश्चित उद्दिष्ट्ये आणि संकेतांसोबत पर्यावरणस्नेही पद्धती समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे बीपीसीएलचे मत आहे.
पर्यावरणस्नेही, शाश्वत सुविधांवर लक्ष केंद्रित करून ही कंपनी शाश्वत विकास साध्य करण्यासाठी सरकारी मंत्रालये, विनानफा तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या संघटना आणि अंमलबजावणी करणाऱ्या इतर एजन्सीजसोबत सहयोग करण्यात नेहमी आघाडीवर असते.
समाजासाठी निरोगी आणि पर्यावरणस्नेही वातावरण निर्माण करण्याबरोबरीनेच कामासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर देखील या कंपनीचा ठाम विश्वास आहे.
ऊर्जा व संचालनात्मक कार्यक्षमता वाढवणे, पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यात मदत करणाऱ्या प्रक्रिया आणि तंत्रज्ञान यामध्ये सुधारणा करणे याला बीपीसीएलने नेहमी प्राधान्य दिले आहे.
डीजेएसआय वर्ल्ड इंडेक्समध्ये दीर्घकालीन आर्थिक आणि ईएसजी घटकांवर आधारित एसअँडपी ग्लोबल ब्रॉड मार्केट इंडेक्समध्ये बाजार भांडवलानुसार सर्वात मोठ्या २५०० कंपन्यांपैकी शीर्ष १०% कंपन्यांचा समावेश आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम फायनान्स इनिशिएटिव्हमध्ये (UNEP FI), डीजेएसआय मूल्यांकनास प्रश्नांची संख्या आणि मागणी केलेल्या माहितीची सखोलता या दृष्टीने सर्वात काटेकोर मूल्यांकन मानले गेले आहे.