भारतामध्ये सर्व प्रथम प्रॉपलिन डेरिवेटीव्ह्स आणण्यामधील त्यांच्या सहभागासाठी विशेष कौतुक
मुंबई, : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बी पी सी एल), एक ‘भारत रत्न’ आणि फॉर्च्यून ग्लोबल ५०० कंपनी, ला त्यांच्या कोची रिफायनरीसाठी ‘एफ आय सी सी आय केमिकल्स अँड पेट्रोलियम पुरस्कार २०२२’ मध्ये ज्यूरींद्वारे विशेष नामांकन प्राप्त झाले. भारतामध्ये पहिल्यांदा प्रॉपलिन डेरिवेटीव्ह्स ची ओळख करून देण्यात सहभागी होऊन ‘मेक इन् इंडिया’ योजनेला प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना हे विशेष नामांकन मिळाले आहे.
कोची रिफायनरी चे कार्यकारी अध्यक्ष श्री. अजित कुमार यांना भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री व रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे झालेल्या एक कार्यक्रमात हा पुरस्कार मिळाला. या वेळी कोची रिफायनरीकडून रिफायनरी प्रोजेक्ट्स ऑर्गनाइज़ेशन चे मुख्य महाव्यवस्थापक श्री. सुरेश जॉन आणि पी इ टी सी एच इ एम चे महाव्यवस्थापक श्री. ए महेंदिरन उपस्थित होते.
प्रॉपलिन डेरिवेटीव्ह्स पेट्रोलियम कॉम्प्लेक्स, जे १४ फेब्रुवारी २०२१ रोजी आपले माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देशास समर्पित केले, ते रू ६००० कोटी खर्च करून बांधण्यात आले आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये जागतिक श्रेणीचा आकार आणि क्षमता असलेले एक अॅक्रिलिक अॅसिड यूनिट, अॅक्रिलेटस् यूनिट आणि ओक्झो अल्कोहोल यूनिट आहे जे आयातीसाठी लागणाऱ्या परकीय चलनावर खर्च होणारे जवळपास वार्षिक रू ४००० कोटी वाचवतील.
केमिकल आणि पेट्रोलियम उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आणि प्रशंसनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना सन्मान देण्यासाठी ‘द फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज(एफ आय सी सी आय)’ हा केमिकल आणि पेट्रोलियम पुरस्कार सोहळा आयोजित करते. या क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींचे योगदान आणि दृढनिश्चय प्रतिबिंबित करणारा हा पुरस्कार भारत शासनाच्या केमिकल आणि पेट्रोलियम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, या क्षेत्रातील मान्यवर आणि इतर भागधारकांच्या उपस्थितीत दिला जातो.
१९२७ मध्ये स्थापित झालेली एफ आय सी सी आय ही भारतातील सर्वात जुनी, सर्वात मोठी व सर्वोच्च व्यापारी संघटना आहे. एफ आय सी सी आय ही एक अशी गैर सरकारी आणि नफ्यासाठी नसलेली संस्था आहे जी भारताच्या व्यवसाय आणि उद्योगाचा आवाज आहे. एफ आय सी सी आय सर्व क्षेत्रांमध्ये एकमत निर्माण करण्यासाठी आणि नेटवर्किंगसाठी एक व्यासपीठ प्रदान करते आणि ही भारतीय उद्योग क्षेत्र, धोरण निर्माते व आंतरराष्ट्रीय व्यापारी समुदाय या सर्वांसाठी सर्वात पहिले ठिकाण आहे जेथे ते व्यक्त होऊ शकतात.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात ४८ कंपन्यांना भारतीय केमिकल आणि पेट्रोलियम उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पुरस्कृत केले गेले.
बी पी सी एल ने संपूर्ण भारत भर सस्टॅनिबीलिटी आणण्यासाठी ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्यामुळे वातावरणावर जो सकारात्मक परिणाम होत आहे त्या यशाला या पुरस्काराने अधोरेखित केले आहे.
कोची रिफायनरीच्या सर्वसमावेशक विस्तारानंतर ती भारतातील सर्वात मोठी पी एस यू रिफायनरी बनली आहे. पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स ची पायाभरणी हे आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशासाठी असलेले पूर्णपणे ‘मेक इन् इंडिया’ उपक्रम आहे. बी पी सी एल ला अभिमान आहे की ती भारतातील पहिली संस्था आहे जिने अॅक्रिलेटस् आणि अॅक्रिलिक विभागात कार्य करण्याचे धाडस दाखविले.