
रत्नागिरी, (आरकेजी) : राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूने आज सकाळी देवरुख येथील राहत्या घरी आत्महत्या केली. प्रफुल्ल कदम असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. प्रफुल्लने यापूर्वी जिल्हास्तरावर गोल्ड मेडल मिळवले होते. तसेच राज्यस्तरावरही तो खेळला होता. जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा तो खजिनदार होता.