मुंबई : महिंद्रा मोजोच्या `बॉर्न फॉर द रोड’ या पुस्तकाचे नुकतेच उद्घाटन झाले. मोजोची स्थापना, सादरीकरण आणि त्यानंतरचा भारतातील प्रवास अशा टप्प्यांवर हे पुस्तक आधारित आहे. मोजोचा थरारक प्रवास, प्रवासाच्या संस्मरणीयकथाही या पुस्तकात विशद करण्यात आल्या आहेत.
महिंद्रा टू व्हिलर्स लिमिटेडचे सीईओ विनोद सहाय म्हणाले की, `मोजो हा महिंद्रा दुचाकींचा प्रमुख ब्रँड आहे. मोजोला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. विविध पुरस्कारदेखील मिळाले आहेत. आजघडीला विश्वसनीय वाहन म्हणून ग्राहकांमध्ये स्वतःचे स्थान स्थापन करण्यातही मोजोला यश प्राप्त झाले आहे.
महिंद्रा टू व्हिलर्सच्या विक्री, वितरण आणि उत्पादन योजनेतील प्रमुख नवीन मल्होत्रा म्हणाले की, ` हे पुस्तक, मोजो या ब्रँडला खऱ्या अर्थाने उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मोजोच्यामालकांना अर्पण केले आहे.”