
महाराष्ट्रात कार्यरत नव्या दमाच्या युवा वर्गास संधी देण्यात आली असून एनएसयुआयच्या माध्यमातून मुंबईतील महाविद्यालयीन क्षेत्रात परिचीत तसेच धडाकेबाज आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नावर न्यायिक लढा देणाऱ्या बोरिवालितील निखिल कांबळे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
मुंबईतील सर्वसामान्य दलित परिवारातून संघर्ष करत शालेय जीवनापासून सामाजिक कार्यात सक्रीय असणारे निखिल कांबळे एनएमएफसी महाविद्यालय अध्यक्ष (2010), एनएसयुआय उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष (2012), एनएसयुआय मुंबई प्रदेश उपाध्यक्ष (2014), एनएसयुआय राष्ट्रीय सचिव (2017) तसेच एनएसयुआय दिल्ली प्रदेश प्रभारी अशा चढत्या आलेखाने विविध पदावर सक्रीय राहिले आहेत. म्हणूनच पक्ष नेतृत्वाने निखिल कांबळे यांच्या सक्रीयतेची जाण ठेवत कांबळे यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस पदी नियुक्ती करत जमिनीशी नाळ असलेल्या एका युवकास नवी जबाबदारी दिली आहे.
पक्षाने दाखवलेला विश्वास अन् आलेल्या संधीचं सोनं करत पक्ष वाढीस अग्रक्रम देण्याचा निर्धार व्यक्त करत कांबळे यांनी जिथे पक्षाची गंभीर स्थिती आहे त्या भागात जावून काम करत पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प व्यक्त केला. निखिल कांबळे यांना रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे।