मुंबई : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून ४० हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी कामगार संघटनांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
मुंबई महापालिका देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून समजली जाते. सुमारे एक लाख ११ हजार कर्मचारीवर्ग येथे कार्यरत आहे. प्रशासनाकडून दरवर्षी दिवाळीला या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देते. यंदा २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी सर्व महापालिका कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन व महागाई भत्याची सरासरी २० टक्के बोनस / सानुग्रह अनुदान असे किमान ४० हजार रुपये दिवाळी म्हणून देण्यात यावे, अशी मागणी महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत पालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच आयुक्तांसोबत चर्चा केली जाईल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी दिली.
















