डोंबिवली : १ जुलै हा सर्वत्र डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो कल्याणच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने मात्र या दिवशी स्वत: रक्तदान करुन आगळ्या पध्दतीने हा दिवस साजरा करुन आदर्श निर्माण केला. या रक्तदान शिबिरात डॉक्टरांसह शासकीय अधिकारी, विद्याथी्र उद्योजक आदिंनी सहभाग धेतला. आज सुमारे २१० रक्त जमा झाले अशी माहिती संस्थेचे सेक्रेटरी डॉ. प्रशांत पाटील यानी सांगीतले.डॉ. पाटील म्हणाले, डॉक्टर्स डे निमित्त दरवर्षी आम्ही हा दिवस रक्तदान देऊन साजरा करत असतो कल्याणमधील ज्येष्ठ डॉक्टर व इ.एन.टी. तज्ञ डॉ. बालिगा यांनी आतापर्यत १२० वेळा रक्तदान केले याबददल त्याचा गौरव करण्यात आला.