बेलापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्य़़मंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा दृष्टीने दि. 15/1/2021 म्हणजे “स्थलसेना दिवस” (Army Day), या दिनाचे औचित्य साधून शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य, मुंबई विभाग (कोकण भवन), व राज्य रक्त संक्रमण परिषद संलग्न टाटा मेमोरेल हॉस्पीटल, खारघर नवी मुंबई यांचे वतीने कोकण भवन, नवी मुंबई येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य नियोजन अजित न्यायनिरगुणे , मुंबई विभागीय अध्यक्ष, कोकण भवन शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी केले होते.
थल सेना दिनानिमित्त सर्व शहीद जवानांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
रक्तदान शिबिर उद्घाटन- रमेश जैद साहेब, सहआयुक्त सेवा व कर, अपिल व डॉ. गणेश धुमाळ, वैद्यकीय अधिकारी कोकण भवन यांचे हस्ते भव्य रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात करण्यात आले.
सदर रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकारी/ कर्मचारी, माजी सैनिक व महिला तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी यांचा उत्सफुर्द प्रतिसाद मिळाला 160 रक्तदाते यांनी नाव नोंदणी करून 119 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
टाटा मेमोरिअल रक्त पेढीच्या टीम ने अंत्यत उत्कृष्टपणे नियोजन करून रक्त दात्यांचे उत्साही वातावरण तयार केले.
प्रमुख उपस्थिती- सदर कार्यक्रमास पुणे विभागीय अध्यक्ष श्री. प्रकाश भिलारे, कोकण विभागीय अध्यक्ष मा. श्री. पावसकर साहेब, सातार जिल्हाध्यक्ष श्री. दयानंद अनपट, रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. बिराजदार, श्री. शैलेश पाटील, नाशिक जिल्हा कार्यकारिणी चे श्री सुनील पवार, विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना नाशिक विभाग, श्री ज्ञानेश्वर पगार, सचिव, श्री राहुल कडलग, कोषाध्यक्ष व श्री दिनेश घोटेकर, कार्यकारिणी सदस्य हे उपस्थित होते. माझ्या बटालियनचा रेजिंग डे व युनिट सायटेशन दिवस असल्यामुळे माझ्या युनिट चे वरीष्ठ अधिकारी श्री. गोवर्धण गवई, सुबेदार सेवानिवृत्त, श्री. त्रंबक इंगळे सुबेदार सेवानिवृत्त, आ.कॅप्टन राजनिकर, श्री. महेंद्र गवई सुरक्षा अधिकारी, टाईम्स आाफ इंडीया, श्री. सुधिर चक्रे, श्री. मनिष पवार, श्री. पांडुरंग गवाने सर, श्री. माधव डकवा. सुरेश काकडे, अध्यक्ष विर जवान फॉउन्डेंशन इ.मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी मुंबई उपनगर जिल्हा सैनिक अधिकारी कॅप्टन रत्नपारखी मॅडम व ठाणे जिल्हा जिल्हा सैनिक अधिकारी मेजर प्रांजल जाधव साहेब उपस्थित होते. विशेष पोलिस उपमहानिरिक्षक, कोकण परिक्षेत्र मा. श्री. संजय मोहिते साहेब, उपसंचालक, उपआयुक्त, मा. श्री. मनोज रानडे साहेब, उपसंचालक, माहिती व जनसंपर्क मा. श्री. डॉ. गणेश मुळे साहेब, मा. श्रीम. माधुरी डोंगरे मॅडम, नायब तहसिलदार, मा.श्री. दिलिप अहिरे, सल्लागार व राज्यकर अधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सुभेच्छा…..
मा.श्री. अण्णासाहेब मिसाळ (भा.प्र.से.), मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी सदर कार्यक्रमास अनुमती व सुभेच्छा दिलेल्या आहेत.
मा. श्री. ए.बी.धुळाज (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, रा.का.वि.सोसायटी, मुंबई यांचे सुभेच्छा पत्र श्री बाळासो जाधव, मुंबई उपनगर जिल्हाध्यक्ष यांचे मार्फत मिळाले आहे.
मा. सहसंचालक, नगर रचना कोकण विभाग यांनी सदर कार्यक्रमास सुभेच्छा व सव्त:हा रक्त दान करून उपस्थितांचे मनोबल वाढविले आहे.
मा. कमांडर श्री. सिधेश्वर कलावत, निवृत्त अधिकारी, इंडीयन नव्ही यांचे सदर संकल्पना राबविण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.
मा. श्री. विजय एन.पुजारी, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित, नवी मुंबई यांचे शुभेच्छा पत्र श्री. गणेश जाधव, विभागीय कोषाध्यक्ष यांचे मार्फत मिळाले आहे.
मा. राज्याध्यक्ष, श्री. आलेगावकर साहेब यांनी फोन द्वारे शुभेच्छा व काही लागल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
मा. उपराज्याध्यक्ष, श्री. बाजीराव देशमुख साहेब यांनी सुध्दा फोन द्वारे शुभेच्छा देऊन संपुर्ण टिमला प्रेरित केले.
मा. सल्लागार, श्री. कमलाकर शेटे साहेब यांनी अंत्यत काळजी पुर्वक कार्यक्रमाच्या अगोदर पासून मार्गदर्शन करीत त्यांनी कार्यक्रम यशस्वी करून दाखविण्यासाठी रक्त दाते यांची लिस्ट बनविने याबाबत महत्वाच्या गोष्टी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. तसेच मा. श्री. पठाण साहेब यांच्या नांदेड येथिल कार्यक्रमामुळे मिळालेली उर्जा यामुळे कार्यक्रम यशस्वी होण्यास प्रेरणा मिळाली.
श्री. दिलावर शादीवान साहेब, राज्य समन्वयक यांचे विशेष मार्गदर्शन व सहयोग लाभलेला आहे.
मा. जिल्हाध्यक्ष जिल्हा जळगाव, श्री. जामोदकर साहेब यांनी सुध्दा दुरध्वनी द्वारे कार्यक्रमास सुभेच्छा दिलेल्या आहेत.
मा. श्री. बोबडे साहेब यांनी सुध्दा मंत्री महोदय यांच्याशी संपर्क करण्यासाठी मदत केली आहे. तसेच सुभेच्छा दिलेल्या आहेत.
मा. श्री. पुस्तोडे साहेब, गायधणे साहेब, तसेच सर्व पदाधिकारी तसेच सदस्य यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुभेच्छा देऊन आम्हचे मनोबल वाढविले आहे.
सदर रक्तदान शिबिराचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे मित्र व सहकारी श्री. दिलावर शादीवान, राज्य समन्वयक, श्री उमाकांत भुजबळ, मंत्रालयीन अध्यक्ष, श्री निलेश कांबळे, जिल्हाध्यक्ष, ठाणे जिल्हा, श्री बाळासो जाधव, मुंबई उपनगर जिल्हाध्यक्ष, श्री. गणेश जाधव कोषाध्यक्ष, श्री. खोपटकर यांनी अहोरात्र मेहनत घेतली. संघटनेच्या प्रत्येकाचे ध्येय हे कार्यक्रम यशस्वी करून दाखविणे यासाठी धडपड व संघटनेच्या वाढीसाठी असलेली तळमळ जाणवते. सर्वांनी आपल्या स्तरावर मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करून दाखवला आहे. त्याबदल आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो.
मा. श्रीमती अश्विनी धुमाळे मॅडम, राज्यकर अधिकारी यांनी आपल्या अंत्यत व्यस्तअश्या कार्यालयीन वेळे मधुन वेळ काढून कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सुत्रसंचालन केले याबदल आपले विशेष आभार व्यक्त करतो.
कोकण भवन मधील राजपत्रित अधिकारी वस्तु व सेवा कर विभाग, कर्मचारी संघटना वस्तु व सेवा कर विभाग, शायकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य कोकण भवन, शासकीय वाहन चालक संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा ठाणे यांचे खुप सहकार्य लाभले. याबदल आपले विशेष आभार व्यक्त करतो.
रक्त दान शिबिराचे वैशिष्ट म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मुख्य द्वार यामध्ये काठलेली रांगोळी मा. श्री. संदीप जठारी यांचे शतश: आभार
श्री. संजय गायकवाड व श्री. गणपत कदम यांचे विशेष आभार त्यांनी संपुर्ण कोकण भवन मध्ये सर्व कार्यालयात जाऊन सर्वाना रक्तदान शिबिर विषयी माहिती पोहचवली.
विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील 1 महाराष्ट्र एनसीसी बटालीयन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. श्री. कॅ. बिपीन धुमाळे सर तसेच सेवानिवृत्त प्राध्यापक मा.श्री. प्रकाश माळी यांचे विशेष आभार.
विशेष कौतुक – श्री. निलेश कांबळे, जिल्हाध्यक्ष ठाणे जिल्हा यांचे चिरंजिव कुमार सशांक इयत्ता 6 वी मध्ये शिकत आहेत यांनी सदर कार्यक्रमाचे काढलेले फोटो खुप जास्त प्रमाणात असल्यामुळे प्रसिध्दी करण्याचे कामामध्ये अडचणी येत असल्यामुळे स्वत:चे ईमेल बनवून गुगल लिंक वरती सर्व फोटो अपलोड करून त्याची लिंक बनवून दिली.