मुंबई, (निसार अली) : कट प्रॅक्टिसला आळा घालून रुग्णांना माफक दरात आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी जनता दल (से.) कडून रक्त तपासणी केंद्र सुरू करण्यात येत आहे. भांडूप पश्चिम गावदेवी रोड येथील ईशान्य मुंबई पक्ष कार्यालयात दि वर्ल्ड लॅब या मुंबईतील अत्याधुनिक रक्त तपासणी प्रयोगशाळेच्या सहकार्याने केंद्र सुरू होणार आहे. १ मे रोजी सकाळी दहा वाजता या केंद्राचे उद्घाटन होईल. गरजूंना ३० ते ५० सवलतीत या केंद्राच्या माध्यमातून रक्ताच्या विविध चाचण्या करून मिळणार आहेत.
ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजीवकुमार सदानंदन यांच्या पुढाकाराने आणि मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर आणि सरचिटणीस ज्योती बढेकर यांची संकल्पना यामागे आहे.
जनता दलाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याचे पत्र घेऊन जाणाऱ्या रुग्णाला द वर्ल्ड लॅबमध्ये थेट गेल्यासही दरातील सवलतीचा लाभ घेता येणार आहे. द वर्ल्ड लॅबचे डॉ. आशिष भोसले आणि त्यांच्या सहकारी यांच्या सहकार्य उपक्रमाला लाभले आह