मुंबई : काळी – पिवळी टॅक्सीधारकांच्या सोयी – सुविधांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. काळी- पिवळी टॅक्सीधारकांना सोयी- सुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
बैठकीस परिवहन आणि बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती- तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम, अपर आयुक्त सतीश सहस्रबुद्धे उपस्थित होते.