मुंबई (निसार अली) : शेतकऱ्यांचा संप मोडण्याकरीता महाराष्ट्र सरकारने गुजरातहुन मागविलेले दूध विकत घेऊ नका, असे आवाहन राष्ट्र सेवा दल मुंबईच्या वतीने कार्याध्यक्ष शरद कदम यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत आज मुंबईच्या अनेक विभागात विविध संस्था संघटनांनी कोरा चहा पीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.
घाटकोपर, माटुंगा, मुलुंड, वरळी
सकल ओ.बी.सी.समाजाच्या वतीने कांचन जाम्बोटी ,वैशाली महाडिक, मंगला बाबु, प्रताप स्वामी, अफज़ल अंसारी, राष्ट्र सेवा दलाकडून श्रीलता शिंदे, सुमन कडलक, रुबीना खान, निकेल फर्नांडिस, एहतराम शेख तसच नव विचार आंदोलनाचे प्रकाश जैसवार, शब्बीर शेख, दिनेश ठाकुर, आतिश ठाकुर, शैलजा एन.सी, सीमा ठाकुर आदींनी राज्य सरकारचा निषेध केला.