नवी दिल्ली : महसूल विभागाअंतर्गत कायदा अंमलबजावणी संस्थांच्या समन्वयित प्रयत्नांमुळे गेल्या तीन वर्षात काळ्या पैशाच्या समस्येशी सामना करण्यात उल्लेखनीय यश आले आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये या काळात अभूतपूर्व कारवाई करण्यात आली. २३०६४ छापे (प्राप्तीकर-१७५२५, सीमाशुल्क-२५०९, केंद्रीय उत्पादन शुल्क-१९१३, सेवा कर-११२०) घालण्यात आले. तर १.३७ लाख कोटी रुपयांची कर चुकवेगिरी उघडकीस आली. त्याचबरोबर २८१४ प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले तर ३८९३ व्यक्तींना अटक करण्यात आली.
गेली २८ वर्षे कार्यरत नसलेला बेनामी व्यवहाराविरोधी कायदा काही सुधारणांसह नोव्हेंबर २०१६ पासून लागू करण्यात आला.
विविध माध्यमांमधून रोखीने होणाऱ्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या.
आगामी काळातही काळ्या पैशाविरोधातील लढा सुरूच राहणार असून कर चुकवणाऱ्यांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.