मुंबई : ऑफ- हायवे टायर्सची भारतातील आघाडीची उत्पादक असलेल्या बालकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेडने (बीकेटी) संकर सिमेंट्स तामिळ नाडू प्रीमियर लीगबरोबर (टीएनपीएल) सहकारी प्रायोजकत्वाचा करार केला आहे. 19 जुलै रोजी टीएनपीएलच्या चौथ्या आवृत्तीचा प्रारंभ होणार आहे. सहकारी प्रायोजक या नात्याने बीकेटी आणि टीएनपीएल यांची भागिदारी प्रमोशन तसेच ब्रँडिंगसह विविध क्षेत्रासाठी लागू असेल.
दिन्डीगुल येथे टीएनपीएलची चौथी आवृत्ती सुरू झाल्यानंचर चेपॉक सुपर गिल्लीज गेल्या वर्षाचे अंतिम फेरीतले स्पर्धक दिन्डीगुल ड्रॅगन्सचा सामना करतील.
या अभियानाअंतर्गत बीकेटी स्पर्धेच्या ठिकाणी महत्त्वाकांक्षी ब्रँडिंगचे काम हाती घेणार असून त्यात पिच मॅट्स, एलईडी बोर्ड आणि पत्रकार परिषदा तसेच मुलाखतींतून केल्या जाणाऱ्या ब्रँडिंगचा समावेश असेल. टीएनपीएलच्याजाहिरातींमध्ये बीकेटी लोगो दिसून येईल व त्यात तमिळ नाडूमध्ये सर्वत्र लावल्या जाणार असलेल्या होर्डिंग्जचा समावेश असेल. बीकेटी स्थानिक उपक्रमांद्वारे तमिळ नाडूमधील नागरिकांनाही स्पर्धेच्या सर्व ठिकाणी मोठ्या संख्येनेउपस्थित राहाण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे.
या भागिदारीविषयी बालकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेडचे (बीकेटी) सह- व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार म्हणाले, ‘देशातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध क्रिकेट लीगशी बीकेटी ब्रँड जोडल्याचे पाहाणे आमच्यासाठी आनंदाची आणिअभिमानाची गोष्ट आहे. या देशात बरेच धर्म आहेत, पण, क्रिकेटइतका दुसरा कोणताच धर्म भारतीयांना एकत्र आणू शकत नाही असे म्हटले जाते. टीएनपीएल पहिल्या वर्षापासूनच यशस्वी झाले आहे आणि त्यादरम्यान तरुण गुणवत्तेचाविकास करून त्यांना देशाचे उद्याचे सुपरस्टार बनवण्याचे आश्वासन पाळले जाते. भविष्यातील विजेते घडवण्याच्या त्यांच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
टीएनसीएचे सह- सचिव आर. आय. पालानी म्हणाले, ‘टीएनपीएलच्या चौथ्या आवृत्तीसाठी बीकेटीबरोबर सहकारी प्रायोजकत्वाचा करार करून आमची लीग आणखी एक स्तर पुढे नेताना आनंद होत आहे. ऑफ- हायवे टायर क्षेत्रात ट्रेंडसेटर असलेली ही कंपनी भारतातील आघाडीचा ब्रँड असून त्यांच्या मदतीने आमच्या निष्ठावान आणि उत्साही चाहत्यांना अविस्मरणीय आठवणी देण्याचा आमचा हेतू आहे. मला खात्री आहे, की बीकेटीमुळे टीएनपीएलचे मूल्य आणखीउंचावेल. यापुढील सहकार्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
पोद्दार पुढे म्हणाले, ‘ही भागिदारी आमच्या अंतिम ग्राहकाच्या जवळ राहाण्याच्या आणि भारतातील ब्रँड जागरूकता वाढवण्याच्या आमच्या धोरणाचाच एक भाग आहे. बीकेटी आमचे सहकारी प्रायोजक असल्यामुळे प्रेक्षकांना ऑफ- हायवेटायर्स तसेच ट्रॅक्टर टायर्ससह विविध प्रकारची वाहनसंबंधी उत्पागदने सहज उपलब्ध होतील.’
या स्पर्धेत 32 सामने होणार असून ते 19 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान घेतले जातील. दिन्डीगुल आणि तिरुनेलवेलीमध्ये प्रत्येकी 15 सामने होणार असून चेन्नईमध्ये अंतिम सामन्यासह उर्वरित दोन सामने होतील. या स्पर्धेमध्ये सात डबल-हेडर्स पाहायला मिळणार आहेत, कारण पहिला व दुसरा सामना अनुक्रमे दुपारी 3:15 आणि संध्याकाळी 7:15 वाजता सुरू होईल.
क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा मॉन्स्टर जॅममधील थरारक स्टंट्स असो- बीकेटीला सर्वच क्रीडाप्रकार आवडतात, कारण त्यामध्ये कंपनीचे कॉर्पोरेट तत्वज्ञान – लक्ष्य साकार करण्याचा आनंद, समाधानाची भावना, प्रयत्न आणि त्यागाचाहोणारा सन्मा, नवे विक्रम नोंदवण्याची क्षमता तसेच कायम उच्च महत्त्वाकांक्षा बाळगणे प्रतिबिंबित होते.
बीकेटीद्वारे बहुतांश वेळेस क्रीडा कार्यक्रमांना पाठिंबा दिला तसेच जगभर त्यांचा पाठपुरावा केला जातो. हे क्रीडाप्रकार ग्राहकांच्या जवळ पोहोचण्यास मदत व ब्रँडबद्दलची जागरूकता वाढवण्यास मदत करण्याच्या निकषांवर निवडले जातात.
या धोरणाचे आणखी एक उदाहरण म्हणजे बीकेटी आणि लीग दे फुटबॉल प्रोफेशनल यांच्यात झालेला प्रायोजकत्व करार, जो सप्टेंबर 2018 मध्ये जाहीर करण्यात आला होता. बीकेटीने कूप दे ला लीगचे शीर्षक प्रायोजकत्व घेतले होते, ज्याचेनाव आता आता कूप दे ला लीग बीकेटी असे ठेवण्यात आले आहे.