
चिपळूण : महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे शनिवारपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रायगड जिल्ह्यातील दौरा आटोपून ना. बावनकुळे मोटारीने चिपळूणच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, ना. बावनकुळे यांनी चिपळूणमध्ये आल्यानंतर भाजपच्या पाग-चिपळूण येथील संपर्क कार्यालयाला भेट दिली.

यावेळी चिपळूण ग्रामीण मंडल आणि शहर मंडलाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

यावेळी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, सरचिटणीस सौ. सुप्रिया उतेकर, चिटणीस अनिल सावर्डेकर, चिटणीस योगेश शिर्के, उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक तसेच भाजपच्या जिल्हा निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, नगरसेविका रसिका देवळेकर, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका अंजली कदम, नगरसेवक शुभम पिसे, नगरसेविका शीतल रानडे, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक, जिल्हा परिषद सदस्य रावी मोरे यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक विजय चितळे,ऍड.नयना पवार,अभय चितळे,बाळा दाते,राकेश दाते,अनवर जबले, रमण डांगे,अर्बन बँक संचालक रत्नदीप देवळेकर,अनिल चिले, रुपेश आवले, सुनील वाजे, तसेच भाजपचे आजी-माजी पदाधिकारी-कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














