
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड्. उज्ज्वल निकम, प्रदेश महामंत्री आ. निरंजन डावखरे, योगेश सागर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
वसंत स्मृती दादर येथे रंगला प्रकाशन सोहळा
मुंबई : भाजपा रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या भाजपा पक्षप्रवेश वर्षपूर्ती कार्य अहवालाचे मंगळवारी (ता. 18) भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.
वसंत स्मृती, दादर (मुंबई) येथे मंगळवारी सायंकाळी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानाबाबत ठाणे, कोकण आणि मुंबई विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीपूर्वी प्रशांत यादव यांच्या कार्यअहवालाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी श्री. यादव यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ तथा खासदार ॲड्. उज्ज्वल निकम, आमदार तथा भाजपा प्रदेश महामंत्री योगेश सागर, आमदार तथा भाजपचे प्रदेश महामंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह रत्नागिरी दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर सुतार, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा चिटणीस अनिल सावर्डेकर, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, रत्नागिरी शहर मंडल अध्यक्ष परशुराम ढेकणे आदी उपस्थित होते.
प्रशांत यादव यांनी 19 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर चिपळूण शहर आणि तालुक्यासह चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात तसेच रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला मोठे बळ मिळाले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडताना प्रशांत यादव यांनी नव्या-जुन्या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजनबद्ध फळी तयार करून आपल्या नेतृत्वाची झलक दाखवून दिली. त्यानंतर पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर 19 फेब्रुवारी 2026 रोजी रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी देखील प्रशांत यादव उत्तमरित्या पार पाडत आहेत. 19 ऑगस्ट रोजी प्रशांत यादव आणि त्यांच्या हजारो समर्थकांच्या भाजप पक्षप्रवेशाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त प्रशांत यादव यांच्या वर्षांपूर्ती कार्य अहवालाचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते तसेच प्रमुख नेत्यांच्या उपस्थित झाल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
*ना. आशिष शेलार यांच्याकडून आपुलकीने विचारपूस!*
यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ना. आशिष शेलार SIR बैठकीपूर्वी सभागृहात दाखल झाल्यानंतर प्रशांत यादव यांनी ना. शेलार यांनाही आपल्या वर्षपूर्ती कार्य अहवालाची प्रत सादर केली. यावेळी ना. शेलार यांनी श्री. यादव यांच्याशी दिलखुलास गप्पा मारत वाशिष्ठी डेअरीबाबत आपुलकीने विचारपूस केली.














