डोंबिवली, 24 मे : कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात दिवसेदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कल्याण तसेच डोंबिवली शहरात काहीसे भितीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बचाव करण्यासाठी पश्चिमेकडील भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी पुढाकार घेतला असून डोंबिवलीतील प्रमुख विभागात ‘अर्सेनिक अल्ब्यूम 30’ होमिओपॅथी औषधाचे मोफत वाटप केले.
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीचे औषध अर्सेनिक अल्ब्यूम 30 या औषधाची शिफारस केली आहे. हे औषध शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढवते. दिवसातून एकदा तीन गोळ्या असे तीन दिवस घेतल्या तर संरक्षण होण्यास मदत मिळते. यामुळे या गोळ्यांचे मोफत वाटप केल्याचे पाटील यांनी सांगितले.
डोंबिवली पश्चिम विभागातील जुनी डोंबिवली, ठाकूरवाडी या विभागात सुमारे 7 हजार बाटल्यांचे वाटप करण्यात आले असून यापुढेही ते सुरू आहे. या उपक्रमासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले असून गणेश निंबाळकर, अंजन शानबाग, प्रथमेश लाड, हितेश सुर्वे, राहून झेपल, सौरभ शेट्टी आदी कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत. कोरोना बरोबर इतर कोणत्याही संसर्ग रोगाचा फैलाव होवू नये म्हणून विभागाती रस्त्यावर तसेच गल्लीबोळात जंतुनाशक निर्जंतुक फवारणी करण्यात येत आहे. या कामासाठी ‘ह’ प्रभाग क्षेत्रातील अग्निशमनदल, पालिका कर्मचारी सहकार्य करीत आहेत.