मुंबई, (निसार अली) : माजी पंतप्रधान अटलबिहारी वायपेयी यांच्या निधनाने देश शोकाकूल असताना मुंबईत भाजपचे नगरसेवक, कार्यकर्ते गोरेगाव येथील एका पुलाच्या फोटोसेशनमध्ये व्यस्त असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी दिनांक 17 ऑगस्ट रोजी वीर सावरकर पुलाचे उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते होणार होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देशात सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार असल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
असे असताना वीर सावरकर पुलाचे श्रेय लाटण्याच्या उद्देशाने भाजपाचे नेत्यांनी पुलावर फोटोसेशन केले, असे बोलले जात आहे.
पी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षा नगरसेविका श्रीकला पिल्ले, नगरसेवक संदीप पटेल,नगरसेवक समीर देसाई यावेळी उपस्थित होते.