डोंबिवली, (प्रशांत जोशी) : शहरात दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार कोटींचे रुपयांचे पॅकेज जाहीर केले, माझ्या माहितीप्रमाणे साडेसहा रुपयेही मिळाले नाहीत. खूप आश्वासने निवडणुकीच्या आधी दिली जातात. त्यातील किती पूर्ण होतात त्याची माहिती तुम्हाला आहे. विविध योजना भाजपा सरकार द्वारे दिल्या गेल्या परतू त्या लबाडा घरच आवताण असल्याची जहरी टीका राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी डोंबिवलीत केली.
माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप यांच्या एकसष्टी सोहळा निमित्त डोंबिवलीतील जाहीर सभेत पवार बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आनंद परांजपे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, माथाडी नेते नरेंद्र पाटील, गणेश नाईक, महेश तपासे, वंडार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पवार पुढे म्हणाले, देशाची परिस्थिती बदलते, आधाडीला अच्छे दिन येत आहेत. सूर्य उगवत आहे त्याची सुरुवात डोंबिवलीतून व्हावी असे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना माहित झाले आहे. सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, काळा पैसा देशात आणू, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख देवू, अशा अनेक घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात या सरकारला शेतकरी, कष्टकरी, कामगार, बेरोजगार यांच्यासाठी काहीही करता आले नाही. नोटाबंदीने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. व्यापारी आणि उद्योजक देखील या सरकारच्या कारभारावर समाधानी नाहीत. याचा परिणाम म्हणून पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला. आता सरकार विरोधातील वातावरण अधिक तीव्र करण्यासाठी १० जानेवारी पासून रायगडावर शिवरायांचा आशीर्वाद घेवून “निर्धार परिवर्तनाचा“ यात्रा काढणार असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले ना – भाजपाने कल्याण डोंबिवलीकरांची फसवणूक केली.
कल्याण डोंबिवलीकरांची सेना – भाजपाने फसवणूक केली. पण आम्ही आमच्या ताब्यात असलेल्या नवी मुंबईत, पुणे ,पिंपरी चिंचवड व कोल्हापूर ठिकाणी पायाभूत विकास केला. सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, काळा पैसा देशात आणू, प्रत्येकाच्या खात्यात लाखो रुपये देऊ अशा घोषणा केल्या काहीही केले नाही. उलट नोटाबंदीने देशाची अर्थव्यवस्था रसातळाला नेवून गरिबांना आणखी गरीब केले. त्यांनी गुलाबराव जगताप यांना शुभेच्छा देतांना सांगितले कि तुंम्ही कष्टकऱ्याना न्याय दिला आहे आम्ही तुम्हालाही न्याय देऊ असे सांगून कौतुकाचा वर्षाव केला.