
मुंबई, 30 सप्टेंबर 2025 : भाजपचे तरुण नेतृत्व किरण शेलार यांच्यामुळे वरळीतील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. मेट्रोच्या रखडलेल्या कामामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. शेलार यांना याबाबत समजताच तातडीने त्यांनी दखल घेतली. मेट्रो प्रशासनाशी संपर्क साधला. स्वत: शेलार हे अधिकाऱ्यांसह उपस्थित राहिले आणि रहिवाशांसमोर असणाऱ्या अडचणी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या.
येथील आचार्य अत्रे चौकातील हार्मनी टॉवर लगत असलेल्या मेट्रोच्या रखडलेल्या कामामुळे स्थानिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सदर कामाची पाहणी व मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून काम पूर्ण करण्याचे वेळापत्रक शेलार यांनी घेतले. एमएमआरसीएलचे सिनिअर डीजीएम (सिव्हील) महेश कुमार डांगे, उप अभियंता प्रतीक काळोखे आणि इतर अधिकाऱ्यांनी काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी हार्मोनी सोसायटीचे जिगर सचदेव उपस्थित होते.















