Ratnagiri : तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी भाजप नेत्या व उद्योजिका उल्का विश्वासराव यांनी आज राजापूर तालुक्यातील काही गावांना भेट देऊन केली. प्रशासन पातळीवर नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत परंतु सामान्य माणसांपर्यंत मदत पोहचेपर्यंत खूप उशीर होतो. या सगळ्याचा आढावा घेऊन उल्का विश्वासराव यांनी स्वतःहून वैयक्तिक स्वरूपात काही आर्थिक मदत केली व त्यांना धीर दिला.
या वेळी नाटे, साखरी नाटे येथील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच यांची भेट घेऊन प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन पाहणी केली. आंबोळगड, जैतापूर, दळे, तुळसुंदे, साखरी नाटे या गावांना आज भेट दिली.
पाहणी करते वेळी अमजद भाई, फैयाजभाई, नाना मयेकर, स्वप्नील गोठणकार, अमित नार्वेकर, दीपक चव्हाण, सुनील बावकर, प्रतिभा लिंगायत, स्मिता नार्वेकर, महेश पारकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. विश्वासराव यांनी केलेल्या या मदतीचे ग्रामस्थांनी आभार मानले.