रत्नागिरी : भाजपा जिल्हाध्यक्ष बाळ माने यांची पत्नी माधवी जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव जिल्हा परिषद गटातून त्या लढत देत आहेत.
शिरगाव हा गट सेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र मिऱ्या या गावातून माधवी यांना भाजपाने रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या मिऱ्या गावातून किती मते मिळतात, यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. माने यांनी सध्या घरोघरी प्रचार करण्यावर भर दिला आहे. जिल्हाध्यक्ष बाळ माने देखील त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. भाजपाने प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे शिवसेनेसमोर आव्हान उभे राहिले आहे. आता सेना भाजपाला कशा प्रकारे प्रत्युत्तर देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.