मुंबई : चर्नी रोड़ स्टेशनवर पादचारी पूल पुन्हा बनविण्याची मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आणि महानगरपालिकेविरुद्ध नुकतीच निदर्शने करण्यात आली. ताड़देव येथील नगरसेविका सरिता पाटील, गिरगाव येथील नगरसेविका डॉ. अनुराधा पोतदार, खेतवाड़ी येथील नगरसेविका मीनल पटेल आणि मलबार हिल भाजपा अध्यक्ष श्वेता मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या शांतीपूर्ण निदर्शनात 300 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
चर्नी रोड़ येथे पादचारी पूल तुटल्यामुळे प्रवाशांचा संपूर्ण संपूर्ण भार उत्तर बाजुस असलेल्या ब्रिजवर पडला आहे. मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढ़ा यांनी याबाबत मनपा तसेच रेलवे अधिका-यांबरोबर बैठक घेतली होती, ज्यामध्ये एलफिंस्टन सारखी दुर्दैवी घटना पुन्हा घड़ू नयेत, म्हणून चर्नी रोड़ येथे लवकरात लवकर कार्यवाही करण्याती मागणी केली होती.
नाना चौक येथील डी वॉर्ड कार्यालयात भाजपा तर्फे झालेल्या या निदर्शनात तीन नगरसेविका तसेच भाजपा अध्य़क्ष यांनी पालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. मोर्चामध्ये दक्षिण मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष शरद चिंतनकर, भाजपाचे महामंत्री नरेंद्र भंडारी सहीत अजय चौरसिया, प्रमोद जैन, अजय पाटील, गौरव तेंडुलकर, रवींद्र करंजगावकर, शाहरुख बिलिमोरिया, प्रशांत राऊल इतर भाचपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.