रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डेजवळ झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला. मयुर देवरूखकर असे त्याचे नाव आहे. मोटारसायकल घेवून रत्नागिरीहून मयुर चिपळूणला निघाला होता. याच सुमारास मुंबईवरून गोव्याकडे निघालेल्या एका ट्रकवर अचानक महावितरणची विद्युतवाहिनी कोसळली. ती वाहिनी ट्रकसोबत पुढे गेली. त्याचवेळी मयुर या मार्गावरुन प्रवास करत सावर्डेजवळ आला. तुटलेली वायर त्याच्या गळ्याला घासून गेली आणि क्षणातच त्याचे शीर धडावेगळे झाले. मयुर हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मुत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अपघाताबाबत ग्रामस्थांना कळताच त्यांनी महावितरण कार्यालयाला घेराव घातला. महावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांआधी या विद्युतवाहिनीसंदर्भात सावर्डे ग्रामस्थांनी महावितरणकडे तक्रार दिली होती. मात्र अधिकार्यांनी दुर्लक्ष केले.