
मुंबई, (निसार अली) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यातील कष्टमय खडतर प्रवास परळच्या बीआयटी चाळ येथील वास्तूमध्ये केला. याच ठिकाणी कोल्हापूर संस्थानचे रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांनी बाबासाहेबांची भेट घेतली. ते ऐतिहासिक ठिकाण नागरिकांपर्यंत पोहचावे, या उद्देशाने अनेक संस्था संघटना एकत्र आल्या आहेत. ही वास्तू व या ठिकाणचे वैशिष्ट्य यांची ओळख व्हावी, म्हंणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा निवासस्थान समिती मुंबईच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम दिनांक 4 डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता परळ, बीआयटीचाळ, दामोदर हॉलच्या बाजूला होणार आहे.
या दरम्यान अनेक मान्यवरांची माहितीपर भाषण देखील होणार आहेत. मोठया संख्येने या अभिवादन सभेला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक शांताराम आंग्रे, शंकर लोखंडे, कांचन नाईक, पायल खरे, सूर्यकांत खरात यांनी केले आहे.