मुंबई, 20 ऑक्टोबर, 2021: तुर्कसेल, तुर्कीच्या ग्लोबल लाइफ आणि कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म बीयपीची मूळ कंपनी ने, नुकतेच ‘स्टेटस’ सुरू केले आहे. जे बीईपी युजर्स साठी फोटोमध्ये मजकूर जोडण्याकरिता आणि इतर युजर्सना त्यावर पाहण्याची आणि टिप्पणी देण्याची एक नवीन सुविधा घेऊन आले आहे. हे युजर्सना त्यांच्या फोटो गॅलरीतून नवीन तसेच संग्रहित फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्याची परवानगी देते. या नवीन वैशिष्ट्यामुळे, युजर्स केवळ त्यांचे ‘स्टेटस’ कोणी पाहिली हे जाणून घेण्यास सक्षम होणार नाहीत, तर चॅट विंडोद्वारे त्यांच्या संपर्क सूचीमधून इतर बीप (BiP) युजर्स चे ‘स्टेटस’ पाहू आणि त्यावर टिप्पणी देखील करू शकतील.
युजर्स चा अभिप्राय तुर्कसेलला बीप मध्ये सुधार करण्यास करत आहे मदत
नवीन सुरू केलेल्या वैशिष्ट्यावर भाष्य करताना, श्री अताक तानसुग, कार्यकारी उपाध्यक्ष, डिजिटल सेवा आणि सोल्युशन्स, तुर्कसेल म्हणाले, “आमच्या ‘स्टेटस’ अॅपवर बहुप्रतिक्षित फीचर लाँच केल्याची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आम्ही नेहमी आमच्या आदरणीय वापरकर्त्यांच्या अभिप्रायासह आमच्या सेवा अद्ययावत करण्याचा प्रयत्न करतो आणि ‘STATUS’ लाँच करणे याचाच परिणाम आहे. आमचे युजर्स बर्याच काळापासून ‘स्टेटस’ वैशिष्ट्याची मागणी करत आहेत आणि ते शेवटी आमच्या प्लॅटफॉर्म वर उपलब्ध झाले आहे. आम्ही तुर्कसेलमध्ये आमची सर्व उत्पादने आणि सेवा सुरक्षा आणि गोपनीयता या दोन्ही दृष्टीने नवीनतम आवश्यकता नुसार श्रेणीसुधारित करतो. आम्ही सध्या नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये गुंतवणूक करत आहोत आणि या वर्षाच्या अखेरीस पूर्ण सुरक्षा आणण्याचे आमचे ध्येय आहे.”
प्रगत वैशिष्ट्ये तुर्कसेल ला इतरांपासून वेगळे करते
तुर्कसेल बीप वापरकर्त्यांचा डेटा तुर्कीमध्ये संपूर्ण उच्च विशेष सुरक्षा डेटा केंद्रांवर साठवते. बीप मध्येच एचडी व्हॉइस आणि ग्रुप व्हिडिओ कॉल कॉन्फरन्सिंग सिस्टम (दहा लोकांपर्यंत) आणि एचडी फोटो शेअरिंग फीचर समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे, त्याचे ‘क्विक ट्रान्सलेट’ वैशिष्ट्य वापरकर्त्यांना 106 वेगवेगळ्या भाषांमध्ये चॅट ची सुविधा प्रदान करते. बीप मध्ये आणीबाणी बटण देखील आहे, जे वापरकर्त्यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रभावित झाल्यास ते कुठे आहेत? हे शेयर करण्याची सुविधा देते. प्रत्येकजण – ऑपरेटरची पर्वा न करता – कुठेही बीप वापरू शकतो. बीपचे ‘ग्रुप इंपोर्ट’ वैशिष्ट्य वापरकर्त्यांना पूर्वीच्या मेसेजिंग अॅप्समधून ग्रुप आणि चॅट इतिहास बीपमध्ये जलद आणि सहज हस्तांतरित करण्याची परवानगी देते. जर मित्रांकडे आधीपासूनच बीप असेल, तर युजर्स त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय स्वयंचलितपणे ग्रुप मध्ये जोडू शकतात – यापुढे ‘हंट एंड पिक” करण्याची गरज नाही.
गूगल प्ले एप्प स्टोर, गूगल प्ले आणि हुआवेई एप्प गैलरी वर BiP च्या नवीनतम आवृत्तीमध्ये प्रवेश करण्यासाठी, कृपया इथे क्लिक करा. http://onelink.to/bip-id
बीप बद्दल :
192 देशांमध्ये कार्यरत तुर्कीचे लाइफ अँड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म बीप इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हॉईस कॉल वैशिष्ट्यांसह 15 लोकांसाठी एचडी-गुणवत्ता ग्रुप व्हिडिओ कॉल ऑफर करते.
बीप मुख्यपृष्ठ स्क्रीनवर वारंवार संवाद साधणारे युजर्स किंवा ग्रुप साठी शॉर्टकट देखील प्रदान करते, ज्यामुळे ग्रुप चॅटमध्ये 1000 वापरकर्त्यांना परवानगी मिळते. बीपने अलीकडेच डार्क मोड आणि पर्सनलाइज्ड मेनू सारख्या चांगल्या फिचर्सची घोषणा केली आहे. हा एप्लिकेशन टेक्स्ट ला आपल्या नुकत्याच आणलेल्या सुविधे सोबत सहज बनवतो, जो यूजर्स ला चॅट संग्रह सोबतच बोल्ड, इटालिक, स्ट्राइकथ्रू अथवा अंडरलाइन सह आपल्या शब्दांवर जोर देण्याकरिता बनविण्यात आले आहे.















