मुंबई : शिक्षणाला वयाची अट नसते हे पुन्हा एकदा मुलुंड प्रभाग १०७ मधील अली बहादूर येथे राहणाऱ्या सविता अजय रोकडे यांनी दाखवून दिले. मुले मोठी असताना परिस्थिती बिकट असताना शिकण्याची जिद्द मनात ठेवून 12वीची परीक्षा दिली आणि त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांचे अभिनंदन करत इंडियन्स सोशल मुव्हमेंटकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
संविधान प्रचारक, सामाजिक कार्यकर्त्या आणि इंडियन्स सोशल मुव्हमेंट या संघटना अध्यक्ष सविताताई सोनावणे (कदम) यांना सविता यांच्या शिक्षणाच्या जिद्दीविषयी समजले आणि certification of Appreciation प्रमाणपत्र देऊन सविता यांना सम्मानीत करण्यात आले. पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सविताताई सोनावणे कदम, मीडिया प्रमुख प्रकाश कदम, अनिताताई सोनावणे (SEO विशेष कार्यकारी अध्यक्ष ) संजय आव्हाड, अजय भाऊ रोकडे उपस्थित होते, अशी माहिती सोनावणे यांनी दिली.
सविता यांची मोठी मुलगी M.Com झालेली आहे. दुसरी मुलगी दहावीत आहे. त्यांचे पती अजय रोकडे खाजगी जॉब करतात. संसाराचा गाडा नेटाने हाकत, कुटुंब सांभाळून शिकण्याची जिद्द मनात ठेवत पुढेही त्या शिक्षण घेणार आहेत. त्यांचा आदर्श इतर महिलांनी घ्यावा जेणेकरून ज्यांचे परिस्थिती मुळे शिक्षण घ्यायचे राहून गेले त्यांनी नक्कीच विचार करावा, असे सोनावणे म्हणाल्या.