
रत्नागिरी,(आरकेजी) : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात बुधवारी बिबट्याचे एक पिल्लू सापडले. सकाळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना हे पिल्लू रस्त्यावर दिसले. त्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. वन विभागाने या ठिकाणी जाऊन पिल्लाला ताब्यात घेतले. पिल्लाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर हे पिल्लू ज्या ठिकाणी सापडले त्याठिकाणी सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एक बिबट्या मादी पिल्लांसह या परिसरात फिरताना आढळली होती. हे पिल्लू सात ते आठ दिवसांचे आहे. बिबट्या मादी ज्या परिसरात फिरत होती त्या परिसरात ते सोडण्यात आले.