रत्नागिरी, (आरकेजी) : मोठया पगाराची मुंबईतील नोकरी सोडून लांजा शहरातील दोन तरुणानी कोकणात भूईमुगाची लागवड यशस्वी केली आहे. त्यासाठी जमिन लीजवर घेवून लाल मातीच्या उदरात या तरुणांनी कोकण टपोरा जातीच्या भूईमुगाचे पीक घेतले आहे. महेश सावंत आणि मिलिंद चव्हाण असे त्यांचे नाव आहे. त्यांनी कृषी पदवीका घेतली आहे.
वय वर्षे वीस असणारे हे दोघे तरुण गावामध्ये आले. जमिन भाड्याने घेऊन या वेगळा प्रयोग करण्यासाठी त्यांनी भुईमुग लागवडीचा निर्णय घेतला. जानेवारीत भूईमुगाची लागवड केली. त्यासाठी कोकण टपोरा ही कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेली जात निवडली. दहा बाय सात अंतरावर बी पेरण्यात आली. एक एकर क्षेत्रासाठी ४० किलो बियाणे कृषी विज्ञान केंद्राकडून देण्यात आले. पुर्ण सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यात आली.
आता भुईमुगाचे पिक येथे आले आहे. त्यांची प्रयोगशीलता पाहून अनेकांनी मदतीचा हात दिला. त्यांच्यामुळे कोकणात पहिल्यांदाच भुईमुग शेतीचा प्रयोग यशस्वी होत आहे.