रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील भोपण रोहिदास वाडीला ७० वर्षानंतर रस्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तंटामुक्त समितीने हस्तक्षेप करुन जागेचा गुंता सोडवला. त्यामुळे येथील नागरिकांना अवागमन करण्यासाठी लवकरच हक्काचा रस्ते मिळणार आहे.
रोहिदास वाडीकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता. जागेची अडचणीमुळे रहिवाशांना शेकडो किलोमिटरचा अंतर पायपीट करुन कापत होते. रुग्ण, अपंगांना, वयोवृद्धांना डोलीने प्रवास करावा लागत होता. वाडीतील लोकांची होणारी गैरसोय थांबावावी, जागा मालकांनी रस्त्याकरिता जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी गेली ७० वर्ष मागणी सुरु होती. परंतु सकारात्मक तोडगा निघत नव्हता. तंटामुक्त समितीने हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. गावकऱ्यांची बैठक घेतली असता, विलास बोबडे या शेतकऱ्यांनी विनामोबदला ६ फूट जागा देण्याचे मान्य केले. त्यांच्या दानवृत्तीमुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. याबैठकीला सरपंच, पोलीस पाटील, दाभोळ सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तायडे व ग्रामस्थ उपस्थित होते.