मुंबई : श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा १४८.३७ कोटी रुपयांचा असून या मंजूर आराखड्यातील सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील कामांसाठी १५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.हा निधी जिल्हाधिकारी पुणे यांना उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा उपयोग पर्यटनावरील भांडवली खर्चासाठी (५३ मोठी बांधकामे) करण्यात येईल. यासंबंधीचा शासन निर्णय नियोजन विभागाने दि. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी निर्गमित केला आहे.