विक्रोळी : भीमा कोरेगाव येथे जातीयवादी शक्तींनी आंबेडकरी अनुयायांवर केलेल्या भ्याड हल्ला आणि प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली बंदची हाक याचा परिणाम म्हणून आज दुपारी 12 पासून पूर्व द्रुतगती मार्ग विक्रोळी जवळ रोखण्यात आला आहे. रुग्णवाहिका, वृद्ध असणाऱ्या गाड्या आणि परीक्षेला जाणारे विद्यार्थी वगळता एकही वाहन सोडले जात नाही आहे. मुंबई आणि ठाणे कडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. नागरिकांनी महामार्गावर ठिय्या मारला आहे. विक्रोळीतील कन्नमवार नगर आणि टागोर नगर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. हजारो च्या संख्येने नागरिक जमले आहेत. मोदी आणि फडणवीस यांच्याविरोधात घोषणा देण्यात येत आहेत