मुंबई : अॅड. चंद्रशेखर आझाद कमाल वालिया यांच्यावरील संभाव्य रासुका कारवाई रोखण्यात यावी, ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करावी, आंबेडकरी चळवळीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे खा. अमर साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, चिंचवली स्मशानभूमी प्रकरणात गंभीर जखमी तानाजी कांबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, आदी प्रमुख मागण्यांसाठी भीम आर्मी राज्यासह मुंबईत निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली.
मुंबईत कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकासमोर भिम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे, प्रवक्ते अमोल मडामे, मुंबई प्रमुख रत्नाकर डावरे व महाराष्ट्र महिला आघाडी सरचिटणीस नेहाताई शिंदे यांच्या नेतृत्वात उत्स्फूर्त पणे आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार अमर साबळे यांना जोडे मारो आंदोलन व डावरे यांच्या नेतृत्वात खा. अमर साबळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी नेहरू नगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात जेष्ठ, विद्रोही शाहीर संभाजी भगत, भीम आर्मी महाराष्ट्र कोअर कमिटी प्रमुख राजू झनके, ज्येष्ठ पत्रकार जासंग बोपेगावकर, सर्जेराव कांबळे, विक्रांत लव्हांडे, शिक्षक महेश खाडे, मायाताई, सुरेश शिंदे, चंद्रकांत देवळेकर, अंकुश भोईटे यांच्या सह ‘जय हो फाऊंडेशनचे’ कार्यकर्ते महीला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
सांगलीत जिल्हाप्रमुख जैलाब भाई शेख, नाशिकमध्ये जिल्हाप्रमुख केतन पगारे, वरिष्ठ नेते कैलास पगारे, अमरावतीमध्ये जिल्हा संघटक राहुल नाईक, हिंगोली जिल्ह्यात जिल्हाप्रमुख आनंद खरे, मराठवाड्यात मनोहर वावले, शिर्डी येथे महाराष्ट्र उप प्रमुख दीपक भालेराव, नागपूरमध्ये विदर्भ संयोजक प्रशांत पौनीकर, नागपूर जिल्हाप्रमुख प्रशांत बनसोड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली.