रत्नागिरी : संभाजी भिडे यांची चिपळूणमधील सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चिपळूणमधील 16 जणांवर चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.22 ऑगस्ट रोजी शिवप्रतिष्ठानचे भिडे यांची चिपळूणमध्ये सभा होती. भिडे यांची सभा होऊ नये, यासाठी अनेकांनी एकत्र येत निदर्शने केली. सभा उधळून लावण्याच्या दृष्टीने जमाव जमा करणे आणि कायद्याचे उलघन करणे असा ठपका 16 जणांवर ठेवण्यात आला आहे. सभा संपवून भिडे जेव्हा बाहेर पडत होते तेव्हा त्यांच्या गाडया रोखण्याचा प्रयत्न झाला.
चिपळूणच्या भेटीदरम्यान भिडे गुरुजी यांनी माध्यमांबाबत केलेल्या वक्तव्याचा पत्रकार संघटनेने निषेध केला आहे.















