डोंबिवली, (प्रशांत जोशी ) : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे वेळीच बंदोबस्त निराळ्या पद्धतीने करणे गरजेचे आहे. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून समस्या सुटणार नाही तर त्यासाठी ठोस उपाय करावा लागेल. प्रशासन जागे झाले तर या उपायासाठी करदाते नागरिक सोबत येतील. कल्याण डोंबिवली महानगर पालिका महापौर विनिता राणे यांनी स्वतः भटक्या कुत्र्यांच्या विषयी महासभेत ठराव आणा अशी मागणी डॉ. आनंद हर्डीकर यांनी केली आहे. हर्डीकर यांनी पालिकेत राणे यांची भेट घेतून शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वस्तुस्थितीची गाथा मांडली. यावेळी अभ्यासू नगरसेवक विश्वनाथ राणे, रमेश जाधव उपस्थित होते.
याबाबत या विषयी त्यांनी पुढे सांगितले कि, कुत्र्यांच्या मारण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा काही नाही. सविस्तर असे आहे कि, मुंबई महापालिकेला १९१ (ब) (अ) खाली उपद्रवी प्राणी मारण्याचा म्हणजे माणूस हा सर्वश्रेष्ठ ही धारणा घटनेची आहे. त्यामुळे माणसाला उपद्रवी ठरणाऱ्याला मारण्याचा अधिकार मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला दिला आहे. सन-१९९४-९५ पासून अशी केस चालू होती. यानंतर सन-२००८ च्या डिसेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला कि, कुत्रे मारण्याचा अधिकार बीएमसीला आहे. त्यानंतर बीएमसीने उपद्रवी कुत्रे मारण्याचे नियोजन केले. परंतु जानेवारी 09 मध्ये प्राणीमित्र परिवार संघटनने सर्वोच्च न्यायालयातून या विषयावर स्टे आणला आणि त्यामुळे अद्यापपर्यंत तो स्टे चालू आहे. या विषयावर दोन-चार वेळा सुनावणी झाली परंतु अजूनही याबाबत निर्णय झाला नसून अद्याप स्टे सुरु आहे.
परंतु हा स्टे उठविता आला नसल्याने देशातील सव्वाशे कोटी जनता या विषयाने बाधित आहे. सगळीकडे हा विषय न्यायालयात असल्याने लोक भयभीत आहेत. मुख्य म्हणजे माणसाला कुत्र्याने दंश केला लक्तरे काढली तरी चालतील पण कुत्र्याला काही करायचे नाही. या विषयाची अजूनही पूर्तता होत नाही. सुप्रीम कोर्ट कुठेही आडवे आले नसून फक्त याला स्टे आहे. केंद्र शासनाच्या अॅनिमल वेल्फेअर बोर्डच्या नियमाप्रमाणे कुत्र्यांची नसबंदी करायची त्यान मारायचं नाही. हा कायदा फक्त कुत्रा या प्राण्यासाठीच का ? हा आम जनतेचा प्रश्न आहे. शहरात जशी माणसांची संख्या वाढत आहे तशी कुत्र्यांचीही संख्या वाढत आहे. अन्यधान्य कचरा ज्या पद्धतीने वाढत चाललं आहे तशी कुत्र्यांची संख्याही वाढत आहे आणि त्यामुळे उपद्रव होत आहे. माणसांवर गल्लीतील कुत्र्यांनी हल्ला करून चिरफाड केल्याच्या अनेक घटना वाढत आहेत. डॉक्टर असल्याने अशा अनेक घटना पाहायला मिळत आहेत. निर्बीजीकरण करून पुन्हा त्याच विभागात कुत्रे सोडले जातात. कुत्रे सर्वत्र धुमाकूळ घालताना दिसतात. वाहनावर धावत जावून अपघात करणे, जगकिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे कि, कुत्रा चावला अगर त्याचं नखही लागलं तर ताबोडतोब गॅमा ग्लोबलिंग ही लस द्यायला पाहिजे. ही गॅमा ग्लोबलिंग अँटी रेबीज सर्वाना दिली पाहिजे असे निर्देश आहेत. हा खर्चही परवडणारा नाही. या विषयी नोंदलेला आकडा प्रचंड आहे. त्यमुळे कृपया महासभेत हा ठराव आणा कि, भटक्या कुत्र्यांचा नायनाट करा यासाठी नागरिकांच्या करातून खर्च करा. अॅनिमल बर्थ कंट्रोल रूल्स 2001 खास कुत्र्यांसाठी असणाऱ्या कायद्यावर फेरविचार व्हावा. कुत्र्यांच्या नसबंदीच नाटक थांबवाव. ज्यांना कुत्र्याचं प्रेम आहे त्यासाठी नोंदणी सक्तीची करून अटी शर्ती लावा अशी विनंती डॉ. हर्डीकर यांनी केली आहे.
महापौर राणे यांनी हा विषय महासभेत घेणार असं आश्वासन दिल्याच डॉ. हर्डीकर यांनी सांगितलं आहे. तसेच प्रत्येक नगरसेवकांनाही त्यांनी याबाबत आवाहन केलं आहे. कुत्र्यापासून नागरीकांना निर्भयपणा मिळावा यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. राज्यभरातून या विषयी हजारो तक्रारी आल्या आहेत. जनतेच्या स्वाथ्यासाठी पुढाकार घ्या असेही आवाहन केले आहे.