भारत पेट्रोलियमने आर्थिक वर्ष २२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये केवळ स्वतःची (स्टँड अलोन बेसिस) २६% महसूल वाढ म्हणजे रू. १,२८,३३३ कोटी महसूल तर आर्थिक वर्ष २२-३३ च्या पहिल्या सहामाहीमध्ये ३९% ने महसूल वाढ म्हणजे रू. २,६६,७२२ कोटी एवढे महसूल जाहीर केले,
- बी पी सी एल ने जुलै ते सप्टेंबर २०२२ या तिमाहीच्या कालावधीमध्ये रू. १,२८,३३२.६८ कोटी महसूल मिळवला. मागील वर्षाच्या याच तिमाहीमध्ये (वाय ओ वाय) रू. १,०१,८८९.१९ कोटी महसूल मिळाला होता. एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या सहामाहीमध्ये रु.२,६६,७२२.२८ कोटी एवढा महसूल मिळवला. मागील वर्षाच्या याच सहामाहीमध्ये (वाय ओ वाय) रू १,९१,५७७.५५ कोटी महसूल मिळाला होता.
- आर्थिक वर्ष २१-२२ च्या याच दुसऱ्या तिमाहीमध्ये (वाय ओ वाय) पुन्हा केलेल्या हिशोबानुसार रु.२,८४०.७३ कोटी एवढ्या नफ्याच्या तुलनेत आर्थिक वर्ष २२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये रू. ३०४.१७ कोटी एवढा निव्वळ तोटा झाला.
भारतातील ऊर्जा कंपन्यांची एक प्रमुख सामाईक ऊर्जा कंपनी भारत पेट्रोलियम ने आर्थिक वर्ष २१-२२ च्या पहिल्या सहामाही (वाय ओ वाय) मध्ये पुन्हा केलेल्या हिशोबानुसार रू ६,०३३.८२ कोटी एवढ्या नफ्याच्या तुलनेत आर्थिक वर्ष २२-२३ च्या पहिल्या सहामाहीमध्ये रू.६,५६७.२२ कोटी एवढा निव्वळ तोटा नोंदविला आहे.
आर्थिक अहवालाचे प्रमुख मुद्दे खालील प्रमाणे (स्टँड अलोन):
- एम. सी. ए आदेशानुसार, बिना रिफायनरी (अर्स्टव्हाइल भारत ओमन रिफायनरीस लिमिटेड)ला बी. पी. सी. एल. मध्ये विलीन झाले आणि बिना रिफायनरीची आर्थिक कामगिरी बी पी सी एल मध्ये १ जुलै २०२१ पासून जोडली गेली. एम. सी. ए आदेशानुसार, भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड ला बी. पी. सी. एल. मध्ये विलीन झाले आणि भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेडची आर्थिक कामगिरी बी पी सी एल मध्ये १ एप्रिल २०२१ पासून जोडली गेली. या विलीनिकरणांना लक्षात घेता, संबंधित कालावधीसाठी जमाखर्च हिशोब पुन्हा केले गेले.
- आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या सहामाहीचे ग्रॉस रिफायनिंग मार्जिनस् (जी आर एम )
$२२.३०/बी बी एल (प्रती बॅरल) आहे, जो मागील वर्षाच्या त्याच सहामाहीमध्ये
(वाय ओ वाय) मध्ये $५.२३/ बी बी एल (प्रती बॅरल) होता.
- आर्थिक वर्ष २२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये रू. ३०४.१७ कोटी एवढा निव्वळ तोटा झाला तर आर्थिक वर्ष २२-२३ च्या पहिल्या सहामाहीमध्ये रू.६,५६७.२२ कोटी एवढा निव्वळ तोटा नोंदविला आहे.
- आर्थिक वर्ष २२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये इ बी आय टी डी ए हा रू १,९९१.४१ कोटी आहे; जो आर्थिक वर्ष २१-२२ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये रू. ५,६५४.८० कोटी होता.
आर्थिक वर्ष २२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये इ बी आय टी डी ए मार्जिन १.५५% आहे तर तो आर्थिक वर्ष २१-२२ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ५.५५% होता.
- ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत डेट इक्विटि रेशो १.१० x होता (३० सप्टेंबर २०२१ ला तो ०.६०x होता).
प्रत्यक्ष कामगिरी (स्टँड अलोन):
- आर्थिक वर्ष २२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये प्रक्रिया करून केलेले उत्पादन ८.८२ एम एम टी आहे; जे आर्थिक वर्ष २१-२२ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ८.९७ एम एम टी होते.
आर्थिक वर्ष २२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये बाजार विक्री ११.४४ एम एम टी आहे; जी आर्थिक वर्ष २१-२२ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ९.९१ एम एम टी होती. आर्थिक वर्ष २२-२३ च्या पहिल्या सहामाहीमध्ये प्रक्रिया करून केलेले उत्पादन १८.५१ एम एम टी आहे तर आर्थिक वर्ष २१-२२ च्या पहिल्या सहामाहीमध्ये प्रक्रिया करून केलेले उत्पादन १५.८१ एम एम टी होते. आर्थिक वर्ष २२-२३ च्या पहिल्या सहामाहीमध्ये बाजार विक्री मागील आर्थिक वर्षाच्या याच पहिल्या सहामाहीच्या तुलनेत (वाय ओ वाय)१८.७३% नी वाढली आहे. आर्थिक वर्ष २२-२३ च्या पहिल्या सहामाहीमध्ये बाजार विक्री २३.२० एम एम टी आहे ; जी आर्थिक वर्ष २१-२२ च्या पहिल्या सहामाहीमध्ये बाजार विक्री १९.५४ एम एम टी होती.
- आर्थिक वर्ष २२-२३ च्या पहिल्या सहामाहीमध्ये आम्ही ९.८७% एवढे सरासरी इथॉनेल ब्लेंडिंग पर्सेंटेज मिळविले. बी पी सी एल ने आपली नेटवर्क ताकद २०४४३ पर्यंत वाढवत आर्थिक वर्ष २२-२३ च्या दुसऱ्या तिमाही मध्ये २२६ नवीन फ्यूएल स्टेशनस् (आर्थिक वर्ष २२-२३ च्या पहिल्या सहामाहीमध्ये ३८८) जोडले.
- कंपनीच्या मालकीचे कंपनी चालवीत असलेले आउटलेट नेटवर्क मध्ये आर्थिक वर्ष २२-२३ च्या पहिल्या सहामाहीमध्ये एका आउटलेट ची भर पडून ते आता ३१६ झाले आहेत.
- बी पी सी एल ने ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत एफ आय एन ओ (फिनो) आर्थिक सेवा १२९७७ फ्यूएल स्टेशनस् पर्यंत वाढविली आहे.
- आर्थिक वर्ष २२-२३ च्या दुसऱ्या तिमाही मध्ये ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत बी पी सी एल ने ४ नवीन वितरक जोडत (आर्थिक वर्ष २२-२३ च्यापहिल्या सहामाहीमध्ये १७वितरक जोडून ) एल पी जी वितरक नेटवर्क ६२३१ पर्यंत नेले आहे आणि ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत ग्राहक संख्या