
नवी दिल्ली : भारत फोर्जचा “एआयएमए मॅनेजिंग इंडिया अॅवॉर्ड्स – इंडियन एमएनसी ऑफ द इयर” पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा एन. कल्याणी यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या हस्ते स्वीकारला.
नवी दिल्ली येथे 26 सप्टेंबर 2018 रोजी झालेल्या, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या (एआयएमए) 45व्या नॅशनल मॅनेजमेंट कन्व्हेन्शनमध्ये भारत फोर्जलागौरवण्यात आले. एआयएमए पुरस्कार नवे बेंचमार्क निर्माण करून उद्योगामध्ये मूलभूत बदल आणणाऱ्या व इतरांसाठी अनुकरणी कार्य करणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तींचीदखल घेतात.
2010 मध्ये सुरुवात झाल्यापासून, या पुरस्काराने भारतातील उद्योग, मीडिया, क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत,एआयएमए मॅनेजिंग इंडिया अॅवॉर्ड्स देशातील सर्वात प्रतिष्ठेचे पुरस्कार म्हणून लोकप्रिय झाले आहे















